लेफ्टनंट जनरल (निवृत्त) अनिल चौहान पुढील चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) असतील. सरकारने बुधवारी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. बिपीन रावत यांच्या निधनानंतर हे पद रिक्त झाले होते. बिपीन रावत यांचा गेल्या वर्षी हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला होता. संरक्षण मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. अनिल चौहान हे सरकारच्या लष्करी व्यवहार विभागाचे सचिव म्हणूनही काम पाहतील. सध्या चौहान एनएससीएसचे लष्करी सल्लागार म्हणून काम पाहत होते. गेल्या वर्षी मे महिन्यात ते निवृत्त झाल्यापासून ते या पदावर होते. तसेच ते बालाकोटवर हल्ला झाला तेव्हा ते डीजीएमओ होते. ऑपरेशन सनराईज ही त्यांचीच डोक्यातून आलेली योजना होती.
UYSMSM, AVSM, SM, YSM यांना पुढील चीफ स्टाफ ऑफ डिफेंस (CDS) म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. ते सरकारच्या लष्करी व्यवहार विभागाचे सचिव म्हणूनही काम पाहतील. अनिल चौहान यांची लष्करात 40 वर्षांहून अधिक काळ कारकीर्द आहे. लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांनी अनेक कमांड्स सांभाळल्या आहेत. त्यांना जम्मू-काश्मीर आणि ईशान्येकडील दहशतवादविरोधी कारवायांचा मोठा अनुभव आहे.
अनिल चौहान यांचा जन्म 18 मे 1961 रोजी झाला. 1981 मध्ये भारतीय लष्कराच्या 11 गोरखा रायफल्समध्ये त्यांची नियुक्ती झाली. ते राष्ट्रीय संरक्षण अकादमी खडकवासला आणि इंडियन मिलिटरी अकादमी, डेहराडूनचे माजी विद्यार्थी आहेत. मेजर जनरल या नात्याने त्यांनी नॉर्दर्न कमांडमधील महत्त्वाच्या बारामुल्ला सेक्टरमध्ये इन्फंट्री डिव्हिजनचे नेतृत्व केले. नंतर लेफ्टनंट जनरल म्हणून त्यांनी ईशान्येतील कॉर्प्सचे नेतृत्व केले. सप्टेंबर 2019 मध्ये, ते पूर्व कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ बनले. मे 2021 मध्ये त्यांच्या निवृत्तीपर्यंत त्यांनी हे पद सांभाळले.
चौहान यांना अनेक लष्करी सन्मान
या कमांड नियुक्त्यांव्यतिरिक्त, चौहान यांनी लष्करी ऑपरेशन्सच्या महासंचालकपदासह महत्त्वाच्या कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्याही केल्या. यापूर्वी चौहान यांनी अंगोलातील संयुक्त राष्ट्र मिशनमध्येही काम केले आहे. चौहान 31 मे 2021 रोजी भारतीय लष्करातून निवृत्त झाले. सैन्यातून निवृत्त झाल्यानंतरही त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा आणि सामरिक बाबींमध्ये योगदान दिले. लष्करातील त्यांच्या विशिष्ट आणि विशेष सेवेबद्दल, लेफ्टनंट जनरल अनिल चौहान (निवृत्त) यांना परम विशिष्ट सेवा पदक, उत्तम युद्ध सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक, सेना पदक आणि विशिष्ट सेवा पदक प्रदान करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.