who is naveen jaihind:
आम आदमी पक्षाच्या नेत्या आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा, राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल सध्या चर्चेत आहेत. त्यांच्यासोबत झालेल्या मारहाण आणि गैरवर्तनाबद्दल त्यांनी अरवींद केजरीवाल यांचे पीए बिभव कुमार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यावर एफआयर देखील दाखल करण्यात आला असून महिला आयोगाने देखील नोटीस पाठवली आहे.
दरम्यान या सर्व प्रकरणात स्वाती मालीवाल यांचे एक्स हजबंड नवीन जयहिंद देखील समोर आले आहेत. त्यांनी स्वाती मालीवाल यांच्या जीवाला धोका असल्याचा दावा केला. तसेच आदमी पक्षावर गंभीर आरोप केले असून स्वाती यांच्यासोबत जे काही घडले ते अगोदरच नियोजित असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान नवीन जयहिंद कोण आहेत. त्यांचं आणि स्वाती मालीवाल यांच लग्न कसं जमलं, हे जाणून घेऊया. एक काळ असा होता की नवीन जयहिंद 'आप'शी एकनिष्ठ होते. मात्र त्यांनी काही वर्षांपूर्वी पक्ष सोडला होता. आता स्वाती मालीवाल यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेनंतर त्यांनी आपविरोधात हल्लाबोल केला. फेब्रुवारी 2020 मध्ये स्वाती मालीवाल यांच्यापासून घटस्फोट घेतल्यानंतर ही कदाचित पहिलीच वेळ आहे, ते आपल्या एक्स पत्नीच्या बाजुने ठामपणे उभे राहीले आहेत.
नवीन जयहिंद कोण आहेत?
नवीन जयहिंद हा हरियाणाचा रहिवासी असून तो जाट समाजातील आहे. सध्या नवीन जयहिंद हे कोणत्याही पक्षाचे नेते नाहीत. त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा होती.
नवीन जयहिंद हे सध्या राजकीय सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि हरियाणामध्ये सार्वजनिक सेवेत काम करतात. नवीन आणि स्वाती मालीवाल यांचे २०१२ मध्ये लग्न झाले आणि फेब्रुवारी २०२० मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.
त्यांनी महर्षि दयानंद विद्यापीठ (MDU), रोहतक येथून शारीरिक शिक्षणात पदव्युत्तर पदवी घेतली आहे. राजकारणात येण्यापूर्वी त्यांना सरकारी नोकरी करायची होती. हरियाणा स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्येही त्याने परीक्षा दिली होती, मात्र तो यशस्वी झाले नाहीत.
नवीन जयहिंद यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, त्यांनी राजकारणात येण्यापूर्वी अनेक वर्षे नोकरीसाठी अर्ज केला होता आणि ऑगस्ट 2020 मध्ये कुरुक्षेत्र केंद्रावर लेखी परीक्षा दिली होती.
नवीन हे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे जवळचे विश्वासू मानले जात होते. अण्णा हजारे यांच्या इंडिया अगेन्स्ट करप्शन आंदोलनापासून नवीन जयहिंद आणि केजरीवाल एकत्र काम करत होते.
केजरीवाल यांनी पक्ष स्थापन केला तेव्हा नवीन जयहिंद राष्ट्रीय पातळीवरील आपच्या कोअर कमिटीचा एक भाग होते. जनलोकपाल विधेयकाचा मसुदा तयार करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. यादरम्यान 2011 मध्ये त्यांनी स्वाती मालीवाल यांचीही भेट घेतली होती.
योगेंद्र यादव यांना पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभागी झाल्यामुळे निलंबित करण्यात आल्यानंतर 2016 मध्ये जयहिंद यांना आपच्या हरियाणा युनिटचे संयोजक बनवण्यात आले होते. नवीन जयहिंद हे त्यावेळच्या पक्षाच्या सर्वोच्च निर्णय घेणाऱ्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य होते.
नवीन जयहिंद हे 2014 च्या लोकसभा निवडणुकीत रोहतकमधून आपचे उमेदवार होते. ते 46,000 मतांसह चौथ्या स्थानावर राहिले. योगेंद्र यादव यांच्याशी झालेल्या वादानंतर नवीन जयहिंद यांनी पक्ष सोडला.
लव्ह स्टोरी वाचा...
अण्णांच्या आंदोलनादरम्यान नवीन जयहिंद आणि स्वाती मालीवाल यांची भेट झाली. नवीन जयहिंद आणि स्वाती मालीवाल इंडिया अगेन्स्ट करप्शन टीमचा भाग होते. नवीन आणि स्वाती हे दोघेही दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जवळचे होते. 2011 मध्ये अण्णांच्या आंदोलनानंतर, जेव्हा इंडिया अगेन्स्ट करप्शन टीम कोळसा घोटाळ्यातील भ्रष्टाचाराच्या आरोपांचा सामना करणाऱ्या नेत्यांच्या विरोधात निदर्शने करण्यासाठी आली तेव्हा नवीन आणि स्वाती एकमेकांच्या जवळ आले.
भ्रष्टाचाराविरुद्ध लढत असताना नवीन जयहिंद यांना एकदा पोलिसांच्या लाठीमाराला सामोरे जावे लागले होते. त्यावेळी स्वाती मालीवाल यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला होता. स्वाती नवीनला वाचवतानाचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. 2012 मध्ये आम आदमी पार्टीच्या स्थापनेपूर्वी नवीन जयहिंद आणि स्वाती मालीवाल यांचे लग्न झाले होते. नवीन आणि स्वाती मालीवाल यांचे लग्न लावण्यात केजरीवाल यांची महत्त्वाची भूमिका होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.