Haryana Next CM: खट्टर यांच्यानंतर हरियाणाचे नवे मुख्यमंत्री होणार नायब सिंह सैनी; जाणून घ्या नव्या CM बाबत

Who is Nayab Singh Saini: हरियाणामध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. नायब सिंह सैनी हे हरियाणाचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. आमदारांच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे
Nayab Singh Saini
Nayab Singh Sainiesakal
Updated on

नवी दिल्ली- हरियाणामध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. नायब सिंह सैनी हे हरियाणाचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. आमदारांच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. अधिकृतरित्या त्यांच्या नावाची घोषणा झाली नाही. पण, सूत्रांच्या माहितीनुसार बैठकीमध्ये त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. आज चार वाजता ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. (Who is Nayab Singh Saini Haryana next CM after Manohar Lal Khattar's exit haryana politics)

मनोहरलाल खट्टर यांनी मंगळवारी सकाळी जवळपास ११ वाजता मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर चंदीगढमध्ये संभाव्य मुख्यमंत्री ठरवण्यासाठी भाजप नेत्यांची एक महत्त्वाची बैठक झाली. यावेळी कुरक्षेत्र लोकसभा मतदारसंघातील खासदार आणि भाजप प्रदेशाध्यक्ष नायब सिंह सैनी यांच्या नावावर एकमत झाल्याची माहिती आहे. (Haryana Politics)

Nayab Singh Saini
Haryana Political Crisis : लोकसभा निवडणुकीपूर्वी हरियाणामध्ये राजकीय भूकंप! मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण मंत्रिमंडळाने दिला राजीनामा

नायब सिंह सैनी कोण आहेत? (Who is Nayab Singh Saini?)

कुरक्षेत्र मतदारसंघातून खासदार असलेले सैनी हे ओबीसी समाजातून येतात. मागील वर्षी ऑक्टोंबर महिन्यात त्यांना हरियाणा भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती मिळाली होती. त्यांची भाजपसोबतची राजकीय कारकीर्द १९९६ मध्ये सुरु झाली होती. छोट्या पदापासून सुरु करुन ते २००५ मध्ये अंबाला जिल्हा अध्यक्ष झाले होते.

पक्षाबाबत असलेली त्यांची निष्ठा यामुळे त्यांना अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या मिळत गेल्या. २०१४ मध्ये त्यांनी नारायणगढ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि जिंकली. २०१६ मध्ये त्यांना हरियाणा सरकारमध्ये मंत्री करण्यात आले होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी प्रतिस्पर्धी काँग्रेसचे नेते निर्मल सिंह यांचा पराभव केला. त्यांनी तब्बल ३.८३ लाख मतांच्या फरकानी विजय मिळवला होता.

Nayab Singh Saini
Haryana Politics BJP-JJP: हरियाणामध्ये काय आहे सत्तेचं गणित? चौटालांनी भाजपची सोडली साथ, अपक्ष आमदारांना 'लॉटरी'

सैनी हे मनोहरलाल खट्टर यांचे विश्वासू मानले जातात. आपल्या कॅम्पमधील नेत्याने राज्याचे नेतृत्व करावे असं खट्टर यांना वाटत होतं. शिवाय जातीय समीकरण लक्षात घेऊन सैनी यांची निवड करण्यात आली आहे. हरियाणामध्ये सैनी यांच्या जातीच्या समूदायाची संख्या ८ टक्के आहे. विशेषत: कुरुक्षेत्र, यमुनानगर, अंबाला, हिसार आणि रावेरी जिल्ह्यात या समूदायाची संख्या जास्त आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.