Who is Nazim : पंतप्रधानांनी 'दोस्त' उल्लेख केलेला नाझिम आहे तरी कोण? मोदींसोबतच्या सेल्फीमुळं होतेय चर्चा

pm modi in kashmir : कलम 370 हटवल्यानंतर पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच गुरूवारी जम्मू काश्मीर दौऱ्यावर गेले आहेत.
Who is PM Modis friend  Nazim from Srinagar Latest News
Who is PM Modis friend Nazim from Srinagar Latest News
Updated on

Who is PM Modis friend Nazim from Srinagar Latest News : कलम 370 हटवल्यानंतर पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच गुरूवारी जम्मू काश्मीर दौऱ्यावर गेले आहेत. येथे गेलेल्या पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर एक सेल्फी शेअर केली आहे. ही सेल्फी सध्या चांगलीच चर्चेत आहे.

पीएम मोदींनी एक्सवर पुलवामा येथील रहिवासी असलेल्या नाझिम यांच्यासोबत शेअर केलेल्या सेल्फी मध्ये त्यांचा उल्लेख दोस्त असा केला आहे. या पोस्टमध्ये मोदींनी लिहीलं की, माझा दोस्त नाझिम याच्यासोबत एक खास सेल्फी. मी त्यांच्या चांगल्या कामामुळे प्रभावित झालोय. जाहीर कार्यक्रमादरम्यान त्यांनी एक सेल्फी घेण्याची विनंती केली, मला त्यांच्यांशी भेटून आनंदी झाला. त्यांच्या भविष्यातील उपक्रमांसाठी माझ्या शुभेच्छा!

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याया पोस्टनंतर पंतप्रधान मोदींनी दोस्त असा उल्लेख केलेला नाझिम नेमकं आहे तरी कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

पंतप्रधान मोदींसोबत सेल्फी काढणारा नाझिम हा विकसित भारत कार्यक्रमाचा लाभार्थी असून त्यांनी विकसित भारत विकसित जम्मू-काश्मीर कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान मोदींशी संवाद साधला होता. या संभाषणादरम्यान नाझिम याने पंतप्रधान मोदींना मध विक्रेते म्हणून केलेल्या प्रवासाबद्दलची माहिती दिली. नाझिमने 2018 मध्ये आपल्या घराच्या छातावर मध विक्रीचा प्रवास सुरू केला होता. दहावीत असताना त्याने मधमाशीपालन सुरू केल्याचे त्याने सांगितलं. जसजशी नाझिमची आवड वाढत गेली, तसतसे त्याने मधमाशीपालनावर अधिक ऑनलाइन रिसर्च करण्यास सुरुवात केली.

Who is PM Modis friend  Nazim from Srinagar Latest News
UCO Bank IMPS Scam : ग्राहकांच्या खात्यात अचानक आले होते 820 कोटी! आता CBIकडून 67 ठिकाणी छापेमारी, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

नाझिम याने सांगितलं की, 2019 मध्ये मी सरकारकडे गेलो आणि मधमाश्यांच्या 25 पेट्यांसाठी मला 50 टक्के अनुदान मिळालं. त्यातून मी 75 किलो मध काढला. हा मध मी गावोगावी विकायला सुरुवात केली, त्यासाठी मला 60,000 हजार रुपये मिळाले. 25 पेट्यांवरून ते नंतर 200 पेट्यांपर्यंत गेलं आणि मग मी पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमाची मदत घेतली. या योजनेअंतर्गत मला 5 लाख रुपये मिळाले आणि 2020 मध्ये मी माझी वेबसाइट सुरू केली. हळूहळू नाझिमच्या मधाच्या ब्रँडला बरीच प्रसिद्धी मिळाली आणि त्याने 2023 मध्येच पाच हजार किलो मधाची विक्री केली.

Who is PM Modis friend  Nazim from Srinagar Latest News
Devendra Fadnavis : शरद पवारांच्या 'त्या' इशाऱ्यावर देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर; म्हणाले, आमदाराला धमकी...

सध्या नाझिम यांच्यासोबत किमान 100 लोक काम करतात. त्यांनी हे देखील सांगितले की आता त्यांना एफपीओ (फॉलो ऑन पब्लिक ऑफर्स) देखील मिळत आहेत. कार्यक्रमादरम्यान नाझिम यांच्यासोबत बोलताना पंतप्रधान मोदींनी विचारलं की ते लहान होते तेव्हा त्यांना काय बनयाचे होते? या प्रश्नाला उत्तर दिलं की त्यांच्या पालकांना तर ते डॉक्टर किंवा इंजीनियर व्हावे असे वाटत होतं. मात्र त्याला काहीतरी वेगळं करण्याची इच्छा होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.