Next BJP National President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची माळ मराठी नेत्याच्या गळ्यात पडणार? 'या' नावांची चर्चा

Next BJP National President: जेपी नड्डा यांचा कार्यकाळ गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये संपला होता, मात्र त्यांना ६ महिन्यांची मुदतवाढ मिळाली होती. आता त्यांची मुदतवाढही ३० जूनपर्यंत संपत आहे. त्यांच्यानंतर आता भाजपच्या अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार यांबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत.
Next BJP National President
Next BJP National PresidentEsakal
Updated on

नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली असून त्यांच्यासोबतच रविवारी संपूर्ण मंत्रिमंडळानेही शपथ घेतली. भाजपचे विद्यमान अध्यक्ष जेपी नड्डा यांना आता केंद्र सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री करण्यात आले आहे. त्यामुळे पक्षाच्या नव्या अध्यक्षाचा शोध अधिक तीव्र झाला आहे.

जेपी नड्डा यांचा कार्यकाळ गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये संपला होता, मात्र त्यांना ६ महिन्यांची मुदतवाढ मिळाली होती. आता त्यांना दिलेली मुदतवाढही आता ३० जूनपर्यंत संपत आहे. त्यामुळे भाजप नव्या अध्यक्षाच्या शोधात असून ज्यांच्या नावांची चर्चा होती त्यांनाही केंद्र सरकारचा भाग बनवण्यात आले आहे.

Next BJP National President
Chandrasekhar Pemmasani : मैं...साक्ष शपथ लेता हू; सर्वात श्रीमंत खासदाराने शपथ घेताना देवाचे नावच घेतले नाही? काय आहे नियम

आतापर्यंत मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडे पक्षाची कमान येऊ शकते, अशी चर्चा सुरू होती. याशिवाय मनोहर लाल खट्टर यांचे नावही चर्चेत होते. मात्र, या दोन्ही नेत्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथही घेतली आहे. धर्मेंद्र प्रधान आणि भूपेंद्र यादव यांच्याबाबतही जोरदार अटकळ सुरू होती.

हे दोन्ही नेते पुन्हा मंत्री झाले आहेत. आता यानंतर संघटनेत आधीच कार्यरत असलेल्या नेत्याला कमान मिळू शकते, अशी जोरदार चर्चा आहे. या नेत्यांमध्ये पक्षाच्या दोन सरचिटणीसांची नावे आहेत. एक नाव सुनील बन्सल. ते यूपीमध्ये संघटनेचे सरचिटणीस होते आणि तेथील विजयाचे श्रेय त्यांना दिले जाते. तर, शर्यतीत दुसरे नाव आहे ते म्हणजे विनोद तावडे याचं.

Next BJP National President
PM Modi Government: मोदी सरकारमध्ये शपथ घेतलेल्या मंत्र्याचा 15 तासांतच राजीनामा? कारणही आलं समोर

सुनील बन्सल हे अमित शाह यांचे विश्वासू मानले जातात. विनोद तावडे यांचे एक नाव चर्चेत आहे. गेल्या काही वर्षांत त्यांच्या कामामुळे ते पुढे आल्याचं सांगितलं जात आहे. महाराष्ट्रातून आलेले विनोद तावडे हे राज्य सरकारमध्ये मंत्रीही राहिले आहेत. सध्या ते सरचिटणीस असून बिहारचे प्रभारीही आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातही त्यांना महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली होती. तावडे यांना अल्पावधीतच मोठे महत्त्व प्राप्त झाले असून ते मोदी सरकारच्या योजनांच्या प्रचाराची धुरा सांभाळत आहेत.

बन्सल यांचे रिपोर्ट कार्डही चर्चेत का आहे, त्यांच्या अध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Next BJP National President
Modi Took Charge as PM: मोदींची पहिली सही शेतकऱ्यांसाठी; कार्यभार स्वीकारताच घेतला हा मोठा निर्णय!

सुनील बन्सल हे ओडिशा, बंगाल आणि तेलंगणाचे प्रभारी आहेत. याआधी त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. यूपीमध्ये त्यांच्या चांगल्या कामगिरीबद्दल त्यांना बक्षीस मिळाले आणि पक्षाने त्यांना राष्ट्रीय स्तरावर भूमिका दिली. त्यांनी अल्पावधीतच भाजप हायकमांडचा विश्वास जिंकला आहे. सध्या नव्या अध्यक्षाचा शोध पूर्ण होईपर्यंत नड्डा या पदावर कायम राहण्याचीही शक्यता आहे. अनुराग ठाकूर यांचे आणखी एक नावही अचानक चर्चेत आले आहे. याचे कारण ते हमीरपूर मतदारसंघातून विजयी झाले असून ते मोदी मंत्रिमंडळात सामील झाले नाहीत.

Next BJP National President
मोदी 3.0 मध्ये महाराष्ट्राचा नाही तर या राज्यांचा आहे दबदबा! कोणाच्या वाट्याला किती मंत्रीपदे?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.