Parakala Vangmayi Wedding News: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची मुलगी परकला वांगमयी हिचा विवाह अत्यंत साधेपणाने पार पडला. 7 जून रोजी लग्नबंधनात अडकलेल्या परकलाने बंगळुरू येथील एका हॉटेलमध्ये कुटुंबीय आणि मित्रांच्या उपस्थितीत सात फेरे घेतले. यावेळी एकही व्हीआयपी किंवा राजकीय व्यक्तिमत्व उपस्थित नव्हते.
सीतारामन यांची मुलगी परकला आणि प्रतीक दोषी यांचा विवाह ब्राह्मण परंपरेनुसार उडुपी अदमारू मठाच्या संतांच्या उपस्थितीत झाला.
या खास प्रसंगी, परकालाने गुलाबी रंगाची साडी नेसली होती. प्रतीकने पांढरा पंचा आणि शाल परिधान केली होती. या खास प्रसंगी निर्मला सीतारामन यांनी मोलाकलमरु साडी नेसली होती.
कोण आहे जावई प्रतीक दोषी आणि मुलगी परकला?
मीडिया रिपोर्टमध्ये असा दावा केला जात आहे की अर्थमंत्र्यांची मुलगी वांगमयी मिंट लाउंजच्या बुक्स आणि कल्चर विभागासाठी फीचर रायटर म्हणून काम करते. परकला वांगमयी या व्यवसायाने मल्टीमीडिया पत्रकार आहेत.
त्यांनी नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटी येथून पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून इंग्रजी साहित्यात बीए आणि एमए केले आहे. तिने लाइव्ह मिंट, द व्हॉईस ऑफ फॅशन आणि द हिंदू सारख्या संस्थांसोबत काम केले आहे.
आणि जावई प्रतीक 2014 पासून पीएमओशी संबंधित आहेत. दोषी हे मूळचे गुजरातचे असून ते पीएमओमध्ये ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी म्हणून काम करतात.
2014 मध्ये मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा त्यांचीही येथे बदली झाली होती. 2019 मध्ये त्यांना सहसचिव पदावर बढती देण्यात आली.
अर्थमंत्र्यांचे जावई दोषी यांनी सिंगापूर मॅनेजमेंट स्कूलमधून पदवी प्राप्त केली आहे. मोदींच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात त्यांनी गुजरातच्या सीएमओमध्ये संशोधन सहाय्यक म्हणूनही काम केले आहे. पीएमओच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, ते पीएमओच्या रिसर्च आणि स्ट्रॅटेजी विंगचे काम पाहतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.