Om Birla: कोण आहेत ओम बिर्ला? दुसऱ्यांदा लोकसभा अध्यक्ष झाल्यास घडणार इतिहास

Lok Sabha Speaker: गेल्या 25 वर्षांपासून देशात सुरू लोकसभेत अध्यक्ष होणारा व्यक्ती पुढच्या वेळी लोकसभेत दिसता नाही.
Om Birla
Om BirlaEsakal

संसदेत बुधवारी लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. यासाठी राजस्थानमधील कोटा लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले भाजप खासदार ओम बिर्ला यांना एनडीएने उमेदवारी दिली आहे.

बिर्ला यांनी सभापतीपदाची निवडणूक जिंकली तर ते भारतीय लोकसभेच्या इतिहासात सलग दोन वेळा सभापती होणारे एकमेव खासदार ठरतील.

यापूर्वी 17 व्या लोकसभेत ओम बिर्ला यांची लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. यानंतर आता 18व्या लोकसभेतही एनडीएमध्ये त्यांच्या नावावर एकमत झाले आहे. त्यांनी उमेदवारीही दाखल केली आहे. एनडीएमच्या संख्याबळानुसार ओम बिर्ला यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे, म्हणजेच लोकसभा अध्यक्ष होण्याचा त्यांचा मार्ग मोकळा आहे.

सलग तीन वेळा आमदार

ओम बिर्ला यांचा संसदीय अनुभव फार काळ नसला तरी 2003 पासून ते सातत्याने प्रत्येक निवडणूक जिंकत आहेत. 2003 मध्ये त्यांनी कोटामधून पहिली विधानसभा निवडणूक लढवली आणि जिंकली. यानंतर 2008 मध्ये त्यांनी कोटा दक्षिण मतदारसंघातून काँग्रेसच्या शांती धारिवाल यांचा पराभव करून विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला. तर 2013 मध्ये त्यांनी कोटा दक्षिणमधून तिसऱ्यांदा विधानसभा निवडणूक जिंकली.

Om Birla
Emergency: बाळासाहेब ठाकरे ते विनोबा भावे... कोणी कोणी दिला होता आणीबाणीला पाठिंबा

2014 मध्ये पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढवली

2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ओम बिर्ला कोटा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. त्यांनी ती निवडणूक जिंकली.

2019 मध्ये बिर्ला पुन्हा खासदार म्हणून निवडून आले आणि यावेळी भाजपने त्यांना सभापती करून सर्वांना आश्चर्यचकित केले. त्यांना प्रदीर्घ संसदीय अनुभव नसला तरी त्यांनी ज्या पद्धतीने लोकसभा चालवली त्याचे सर्वांनी कौतुक केले.

2024 च्या लोकसभा निवडणुकीत तिसऱ्यांदा विजयाची नोंद केल्यानंतर बिर्ला पुन्हा एकदा लोकसभा अध्यक्षपदाचे दावेदार बनले आहेत.

Om Birla
Emergency 1975: सुमारे 50 वर्षांपूर्वी 'असा' झाला होता लोकशाहीवर हल्ला; जाणून घ्या आणीबाणीबाबतच्या '5' गोष्टी

ओम बिर्लांनी मोडली 25 वर्षांची परंपरा

ओम बिर्ला अशी व्यक्ती आहेत जे 25 वर्षांची परंपरा मोडून लोकसभेत पोहचले आहेत. गेल्या 25 वर्षांपासून देशात सुरू लोकसभेत अध्यक्ष होणारा व्यक्ती पुढच्या वेळी लोकसभेत दिसता नाही, पण २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ओम बिर्ला यांनी ही परंपरा मोडीत काढली होती. बिर्ला हे गेल्या लोकसभेतही अध्यक्ष होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com