Rahul Gandhi: राहुल गांधींच्या नावे 4 मजली घर करणारी राजकुमारी गुप्ता आहे तरी कोण?

एका महिला नेत्याने राहुल गांधी यांच्यावर नावावर ४ मजली घर केले आहे.
Who is Rajkumari Gupta who offered her 4 storey house to Rahul Gandhi
Who is Rajkumari Gupta who offered her 4 storey house to Rahul Gandhi
Updated on

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द केल्यानंतर त्यांना सरकारी बंगला रिकामा करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. यानंतर काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते 'मेरा घर, राहुल गांधी का घर'च्या नावाने प्रचार करत आहेत. अशातच एका महिला नेत्याने राहुल गांधी यांच्यावर नावावर ४ मजली घर केले आहे. त्यामुळे ही काँग्रेस महिला आहे तरी कोण? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. (Who is Rajkumari Gupta who offered her 4 storey house to Rahul Gandhi )

राजकुमारी गुप्ता असे या महिलेचे नाव असून त्यांनी दिल्लीतील मंगोलपुरी भागात असलेले आपले ४ मजली घर राहुल गांधी यांच्या नावावर केले आहे. राजकुमारी गुप्ता या दिल्ली काँग्रेस सेवादलाशी संबंधित आहेत. लोकसभा सदस्यत्वासाठी अपात्र ठरलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांना २२ एप्रिलपर्यंत सरकारी बंगला खाली करण्यास सांगण्यात आले आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेचे सदस्यत्व गमावल्यानंतर काँग्रेसने 'मेरा घर, राहुल गांधी का घर', असा प्रचार केला. राहुल गांधी यांना गेल्या आठवड्यात लोकसभेतून अपात्र ठरवण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर, गृहनिर्माण समितीने राहुल गांधी यांना १२ तुघलक लेन येथील त्यांचा सरकारी बंगला रिकामा करण्याची नोटीस पाठवली आहे.

गेल्या १५ वर्षापासून काँग्रेससोबत

मंगोलपुरी येथील रहिवासी असलेल्या राजकुमारी गुप्ता गेल्या 15 वर्षांपासून काँग्रेसशी संबंधित आहेत. त्या सातत्याने काँग्रेस पक्षासाठी कार्यरत आहेत. राजकुमारी गुप्ता म्हणाल्या की, गेल्या काही दिवसांत राहुल गांधींसोबत घडलेल्या घटनांमुळे मला खूप दु:ख झाले आहे. राहुल गांधींना मी माझा भाऊ मानते. बहीण म्हणून कर्तव्य पार पाडत आपले घर राहुल गांधींच्या नावावर दिल्याचे त्यांनी स्वतः सांगितले.

मंगोलपुरी येथील वसाहत राहुल गांधी यांच्या आजी इंदिरा गांधी यांनी बांधली होती. हे घर देखील त्यांनीच दिलेलं आहे. इंदिरा गांधी यांनी दिलेलेच घर मी त्यांचा नातू राहुल गांधी यांच्यावर नावावर करत आहे. असही गुप्ता यांनी सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.