PM मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील, आम्हालाही तसाच नेता हवा.. पाकिस्तानी अब्जाधीशाने उधळली स्तुतीसुमनं

Lok Sabha poll prediction: पाकिस्तानी वंशाचे अब्जाधीश उद्योगपतींना पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक करत ते तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होणार हे नक्की असं म्हटलं आहे. पंतप्रधान मोदी हे केवळ भारतासाठीच नाही तर जगासाठी चांगले नेते आहेत. पाकिस्तानलाही त्यांच्यासारख्या नेत्याची गरज आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.
Lok Sabha poll prediction
Lok Sabha poll predictionEsakal
Updated on

पाकिस्तानी वंशाचे अमेरिकन अब्जाधीश उद्योगपती साजिद तरार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. ते म्हणाले की मोदी हे एक मोठे नेते आहेत ज्यांनी भारताला नवीन उंचीवर नेले आहे आणि ते निश्चितपणे तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होतील. पंतप्रधान मोदी हे केवळ भारतासाठीच नाही तर जगासाठी चांगले नेते आहेत. त्यांच्यासारखा नेता पाकिस्तानलाही मिळावा, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली आहे.

बाल्टिमोरमधील पाकिस्तानी वंशाचे व्यापारी साजिद तरार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक चांगले पंतप्रधान आणि भारताचे सर्वात शक्तिशाली नेते असल्याचे म्हटले आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदींच्या विजयाचे भाकीतही त्यांनी केले. ते तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होणार असल्याचा दावा त्यांनी केला. ते म्हणाले, “मोदी हे एक अद्भुत नेते आहेत. ते जन्मजात नेता आहे. प्रतिकूल परिस्थितीत पाकिस्तानला भेट देणारे आणि आपली राजकीय विश्वासार्हता पणाला लावणारे ते एकमेव पंतप्रधान आहेत. मला आशा आहे की मोदीजी पाकिस्तानशी चर्चा आणि व्यापार सुरू करतील, असंही त्यांनी म्हटलं आहे.

Lok Sabha poll prediction
News Click Raid: न्यूजक्लिकच्या संपादकांची अटक अन् कोठडी अवैध; सुप्रीम कोर्टाने दिले सुटकेचे आदेश

पाकिस्तानातील शांतता भारतासाठीही चांगली

एका प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले, “शांततापूर्ण पाकिस्तान भारतासाठीही चांगले असेल. पाकिस्तान सध्या गंभीर आर्थिक संकटातून जात आहे. पाकव्याप्त काश्मीरसह (पीओके) देशाच्या अनेक भागात अशांतता निर्माण झाली आहे. "पाकिस्तान आर्थिक संकटातून जात आहे. महागाई शिगेला पोहोचली आहे. पेट्रोलच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. आयएमएफला कर वाढवायचे आहेत. विजेच्या किमती वाढल्या आहेत. आम्ही निर्यात करू शकत नाही. पीओकेमध्ये मुख्यत्वे वीज बिलात झालेली वाढीमुळे आंदोलन सुरू आहे.

Lok Sabha poll prediction
Covid New Variant : अरे बापरे! कोरोनाचा आणखी एक व्हेरियंट आला समोर.. काय आहेत 'FLiRT'ची लक्षणं? भारताला किती धोका?

शाहबाज यांच्या क्षमतेवर उपस्थित केले प्रश्न

पीओकेमधील लोकांना आर्थिक मदत देण्याच्या पाकिस्तानी पंतप्रधानांच्या निर्णयावरही साजिदने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. ते म्हणाले, "पैसा कुठून आणणार? ते IMFसोबत नवीन मदत पॅकेजवर चर्चा करत आहेत. पाकिस्तान आर्थिक संकटातून जात आहे. अशा वाईट काळात शाहबाज शरीफ यांचा हा निर्णय योग्य नाही."

पाकिस्तानला मोदींसारख्या नेत्याची गरज

ते पुढे म्हणाले, "खेदाची गोष्ट आहे की, पाकिस्तानमध्ये तळागाळातील समस्या सोडवण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले जात नाहीत. निर्यात कशी वाढवायची? दहशतवादावर नियंत्रण कसे ठेवायचे आणि कायदा आणि सुव्यवस्था कशी सुधारायची, या मुद्द्यांवर चर्चा होऊन काम झाले पाहिजे. सध्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये (PoK) अशांतता आणि राजकीय अस्थिरता आहे. तरार म्हणाले, या सर्व समस्यांपासून दूर राहून पुढच्या स्तरावर नेणारे नेतृत्व मिळावे.

तरार हे 1990 च्या दशकात अमेरिकेत स्थायिक झाले होते आणि पाकिस्तानातील सत्तेत असलेल्या लोकांशी त्यांचा चांगला संपर्क असल्याचे मानले जाते. ते म्हणाले, “भारतातील 97 कोटी लोक त्यांच्या मताधिकाराचा वापर करत आहेत, हे चमत्कारापेक्षा कमी नाही. भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. मी तिथे मोदीजींची लोकप्रियता आणि 2024 मध्ये भारताचा नेत्रदीपक उदय पाहत आहे.

Lok Sabha poll prediction
Israel-Hamas War: पुण्याचे निवृत्त कर्नल गाझामधील हल्ल्यात ठार; दोन महिन्यांपासून UN सोबत करत होते काम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.