Future Gaming : 'लॉटरी किंग'ने घेतले 1,386 कोटींचे इलेक्टोरल बाँड्स! ED ने देखील दिलाय दणका, कोण आहे 'फ्युचर गेमिंग' कंपनीचे मालक?

Lottery King of India : निवडणूक आयोगाने गुरुवारी इलेक्टोरल बाँड्सचा डेटा सार्वजनिक केला. यामध्ये राजकीय पक्षांना आतापर्यंत या माध्यमातून किती पैसे प्राप्त झाले याबाबत यात माहिती दिली आहे.
Lottery King Santiago Martin
Lottery King Santiago MartineSakal
Updated on

Future Gaming and Hotel Services Owner : निवडणूक आयोगाने गुरुवारी इलेक्टोरल बाँड्सचा डेटा सार्वजनिक केला. यामध्ये राजकीय पक्षांना आतापर्यंत या माध्यमातून किती पैसे प्राप्त झाले याबाबत यात माहिती दिली आहे. सोबतच कोणत्या कंपनीने किती रुपयांचे बाँड्स घेतले हेदेखील स्पष्ट झालं आहे. 'फ्युचर गेमिंग अँड हॉटेल सर्व्हिसेस' ही कंपनी या यादीमध्ये टॉपला राहिली. या कंपनीने तब्बल 1,368 कोटी रुपयांचे बाँड्स खरेदी केले होते. (Electoral Bonds)

फ्युचर गेमिंग कंपनीच्या मालकाचं नाव सँटियागो मार्टिन (Santiago Martin) आहे. मार्टिन यांना देशात 'लॉटरी किंग' म्हणून ओळखलं जातं. विशेष म्हणजे, गेल्या कित्येक वर्षांपासून मार्टिन हे ईडी, सीबीआय अशा सरकारी यंत्रणांच्या रडारवर आहेत. त्यांच्यावर आतापर्यंत कित्येक वेळा कारवाई देखील करण्यात आली आहे. (Future Gaming Owner)

कोण आहेत मार्टिन?

मार्टिन यांच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी वयाच्या 13व्या वर्षापासूनच लॉटरी व्यवसाय सुरू केला होता. अवघ्या काही वर्षांमध्येच त्यांनी हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढवला. दक्षिणेकडील राज्यांमध्ये त्यांनी आपला व्यवसाय सुरू केला होता. मात्र काही वर्षांमध्ये सिक्कीम, पश्चिम बंगाल, पंजाब, महाराष्ट्र आणि म्यानमार मध्येही मार्टिन यांनी लॉटरी व्यवसाय सुरू केला.

इतरही व्यवसायांमध्ये उडी

लॉटरीसोबतच मार्टिन यांचे इतर कितीतरी व्यवसाय आहेत. रिअल इस्टेट, कंस्ट्रक्शन, अल्टर्नेट एनर्जी, व्हिजुअल मीडिया एंटरटेन्मेंट, टेक्स्टाईल्स, हॉस्पिटॅलिटी, हेल्थ केअर, एज्युकेशन, सॉफ्टवेअर, प्रॉपर्टी डेव्हलपमेंट, अ‍ॅग्रो, ऑनलाईन गेमिंग, कॅसिनो आणि बिल्डिंग मटेरिअल्स अशा सर्व क्षेत्रांमध्ये मार्टिन कार्यरत आहेत.

सर्वाधिक कर भरणारी व्यक्ती?

मार्टिन यांच्या वेबसाईटवर (Santiago Martin website) असा दावा करण्यात आला आहे, की ते काही वर्षं देशातील सर्वाधिक कर भरणारी व्यक्ती होते. त्यांनी अब्जावधींचा कर भरल्याचंही याठिकाणी म्हटलं आहे. एवढंच नाही, तर त्यांच्या लग्नाच्या 50 व्या अ‍ॅनिव्हर्सरीला सँटियागो मार्टिन आणि त्यांच्या कुटुंबियांना होली फादर पोप बेनेडिक्ट XVI यांनी स्वतः आशीर्वाद दिल्याचा दावाही या वेबसाईटवर केला आहे.

Lottery King Santiago Martin
Electoral Bonds Data Disclose : अखेर इलेक्टोरल बाँडचा डेटा झाला उघड! BJP नंबर १ तर दोन नंबरला कोण? धक्कादायक खुलासा..

ईडी-सीबीआयच्या रडारवर मार्टिन

फ्युचर गेमिंग कंपनी आणि मार्टिन हे गेल्या कित्येक वर्षांपासून सरकारी संस्थांच्या रडारवर आहेत. 2007 सालापासूनच मार्टिन यांच्याविरोधात सीबीआय केसेस दाखल आहेत. 2015 साली त्यांच्यावर देशातील कित्येक राज्यांमध्ये लॉटरी स्कॅम केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. तर 2019 साली त्यांच्यावर अशाच स्कॅममधून 910 कोटी लाटल्याचा आरोप केला होता.

मार्टिन यांच्यावर झालेल्या कारवाईमध्ये 2022 साली त्यांची सुमारे 500 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली होती. तसंच, 2023 च्या मे महिन्यात देखील त्यांची 457 कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.