अयोध्येत एका भव्य सोहळ्यात २२ जानेवारी रोजी प्रभू रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या कार्यक्रमासाठी जय्यत तयारी सुरू आहे. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी विविध क्षेत्रतील मान्यवर तसेच राजकीय क्षेत्रातील विरोधकांना देखील निमंत्रणे पाठवण्यात आली आहेत. दरम्यान राम मंदिराचा हा उद्घाटन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडेल.
अयोध्येतील राम मंदिरात प्रभू श्रीरामच्या मूर्तीची निवड सोमवारीच करण्यात आली आहे. तर म्हैसूर (कर्नाटक)चे प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी घडवलेली मूर्ती निश्चीत करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर याबद्दल माहिती दिली आहे.
त्यांनी लिहीलं की, जेथे राम आहेत, तेथेच हनुमान आहे... अयोध्येमध्ये भगवान श्री रामामाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी मूर्तीची निवड करण्यात आली आहे. देशातील प्रसिद्ध शिल्पकार, आमची शान अरुण योगीराज यांनी बनवलेली रामाची मूर्ती अयोध्येत बसवली जाणार आहे. राम हनुमानाच्या अतूट नात्याचे हे आणखी एक उदाहरण आहे. हनुमानाची भूमी असलेल्या कर्नाटकातील रामललासाठी ही एक महत्त्वाची सेवा आहे यात शंका नाही.
अरुण योगीराज कोण आहेत?
तर रामाची मूर्ती घडवणारे 37 वर्षीय अरुण योगीराज हे कर्नाटकातील प्रसिद्ध शिल्पकार योगीराज शिल्पी यांचे पुत्र आहेत. इतकंच नाही तर अरुण योगीराज यांचे वडील वाडियार घराण्याच्या राजवाड्यांच्या संदर्भात त्यांनी केलेल्या कामासाठीही ओळखले जातात. अरुण योगीराज यांनी 2008 मध्ये म्हैसूर विद्यापीठातून एमबीएचे शिक्षण घेतले आहे.
अरुण योगीराज यांनी सुभाषचंद्र बोस यांचा 30 फूट उंच पुतळा बनवला होता, जो इंडिया गेट येथील अमर जवान ज्योती स्थळाच्या मागे बसवण्यात आले आङे. पंतप्रधान मोदींनी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा बसवला तेव्हा त्यांनी शिल्पकार अरुण योगीराज यांचेही कौतुक केले होते. एवढेच नाही तर अरुण योगीराज यांनी पंतप्रधान मोदींचीही भेट देखील घेतली आहे. याशिवाय अरुण योगीराज यांनी केदारनाथमध्ये आदि शंकराचार्यांची 12 फूट उंचीची मूर्ती बनवली होती, त्यानंतर अरुण योगीराज हे चर्चेत आले होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.