PM Modi Government: मोदींच्या मंत्रिमंडळातून २४ तासात बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त करणारा मंत्री कोण?

PM Modi Government: मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर २४ तासातच मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त करणारा हा मंत्री नेमका कोण? त्याला मंत्रिपद का नको? त्या मागची कारणं समजून घेऊयात.
PM Modi Government
PM Modi GovernmentEsakal
Updated on

‘मला खासदार म्हणून काम करायचंय, मंत्री व्हायचं नव्हतं’, असं वक्तव्य मोदींच्या मंत्रिमंडळातील एका राज्यमंत्र्यानं केलं आहे. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर २४ तासातच मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त करणारा हा मंत्री नेमका कोण? त्याला मंत्रिपद का नको? त्या मागची कारणं समजून घेऊयात.

केरळ. दक्षिणेतलं महत्वाचं राज्य. या केरळात कायम काँग्रेस पक्ष आणि कम्युनिस्ट पक्षांनी आपलं वर्चस्व ठेवलं आहे. लोकसभा निवडणुकीतही कम्युनिस्ट पक्ष आणि काँग्रेसचे खासदार इथून निवडून यायचे. पण, लोकसभा निवडणूक २०२४ यंदा केरळातही खूप खास ठरली आहे. कारण, पहिल्यांदाच केरळात कमळ फुललंय. त्रिसूर मतदारसंघातून प्रसिद्ध अभिनेते सुरेश गोपी हे कमळ चिन्हावर यंदाची लोकसभा निवडणूक जिंकलेत. त्यांनी कम्युनिस्ट पक्षाच्या एड. व्ही एस सुनिलकुमार यांचा ७४ हजार मतांनी पराभव केला आहे.

PM Modi Government
Oath Viral Video: मोदी सरकारच्या शपथविधी सोहळ्यातही पोहोचला बिबट्या? राष्ट्रपती भवनातील व्हिडीओ व्हायरल

त्यामुळे भाजपचा केरळातील पहिला खासदार होण्याचा मान पटकावणारे सुरेश गोपी नेमके कोण आहेत? ते आधी समजून घेऊयात-

सुरेश गोपी हे दाक्षिणात्य सिनेसृष्टीतलं मोठं नाव

जवळपास २०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं

२०१६ मध्ये भाजपात पक्षप्रवेश

२०१६ सालीच राष्ट्रपतीनियुक्त खासदार म्हणून राज्यसभेवर नियुक्त

२०१९ साली लोकसभा लढवली पण पराभूत झाले

२०२४ ला ७४ हजाराच्या मताधिक्यानं विजय मिळवला

PM Modi Government
Lok Sabha Election 2024 : राज्यात 91 टक्के उमेदवारांची ‘अनामत’ जप्त; ठाकरे गट, वंचित बहुजन आघाडीसह सपचा समावेश

खरंतर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत "थ्रिसूरचे केंद्रीय मंत्री, मोदींची गॅरंटी" असा प्रचार केला जायचा. अशातच सुरेश गोपी यांचं नाव केरळच्या राजकीय इतिहासातही नोंदवलं जाईल कारण ते लोकसभा निवडणुकीत विजय मिळवून जिंकून आलेले भाजपचे पहिले खासदार आहेत. त्यामुळे ते निवडून आल्यावर दक्षिणेत आपला पाया आणखी मजबूत करण्याच्या दृष्टीनं मोदींच्या मंत्रिमंडळात त्यांची वर्णी करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. ९ जूनच्या संध्याकाळी मोदींसोबत सुरेश गोपी यांनीही राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पण, त्यानंतर आता २४ तासात याच सुरेश गोपी यांनी मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केली आहे, त्यामुळे राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये आहेत.

PM Modi Government
Modi Cabinet: लोकसभेच्या 14 जागा गमावूनही मोदींनी महाराष्ट्रातून केली 6 मंत्र्यांची निवड, काय कारण आहे ?

तरी, सुरेश गोपी नेमकं काय म्हणालेत ते आधी पाहूयात-

मला खासदार म्हणून काम करायचं आहे. मला सिनेमांमध्ये कामही करायचं आहे. त्यामुळे मंत्रिपद नको अशी माझी भूमिका होती. मला त्यात स्वारस्य नसल्याचं पक्षाला सांगितलं होतं. मला वाटतं की, ते लवकरच मला यातून मुक्त करतील.

सुरेश गोपी, केरळातील भाजप खासदार

त्यामुळे आता सुरेश गोपी यांनी जरी मोदींच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली असली तरी, २४ तासाच्या आत त्यांनी बाहेर पडण्याची व्यक्त केलेली इच्छा भाजप पक्षश्रेष्ठी पुरी करणार का? हे पाहणं महत्वाचं असेल.

PM Modi Government
2 साप प्रवृत्तीच्या नेत्यांसोबत सरकार स्थापन करणे मोदींची सर्वात मोठी चूक'; भाजपच्या वरिष्ठ नेत्याचा घरचा आहेर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.