Arvind Kejriwal Sent to Judicial Custody Latest News : दिल्लीच्या कथित मद्य घोटाळ्यात अटक झालेल्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना १५ एप्रिलपर्यंत तिहार जेलमध्ये राहावे लागणार आहे. दिल्लीच्या राउज एव्हेन्यू कोर्टाने त्यांना १५ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठले आहे. यापूर्वी १० दिवस केजरीवाल हे ईडीच्या कोठडीत होते.
दरम्यान सोमवारी केजरीवाल यांची रिमांड संपणार होती. त्यामुळे जेव्हा त्यांना कोर्टात सादर करण्यात आले तेव्हा त्यांना १५ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले.
दरम्यान ईडीने दावा केला आहे की, चौकशी दरम्यान केजरीवाल यांनी विजय नायर त्यांना नव्हे तर आतिशी आणि सौरभ भारद्वाज या दोन मंत्र्यांना रिपोर्ट करत होते असे सांगितले आहे. ईडीने जेव्हा ही बाब कोर्टासमोर मांडली तेव्हा केजरीवाल यांनी याचा विरोध केला नाही. त्यामुळे या प्रकरणात आतिशी आणि सौरभ भारद्वाज यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विजय नायर यांना कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणात सर्वात पहिल्यांदा अटक करण्यात आली होती. तसेच विजय नायर यांना मनीष सिसोदिया यांच्या जवळचे मानले जाते.
तर विजय नायर काही वर्ष आम आदमी पक्षाचे मीडिया प्रभारी राहीले आहेत. तसेच मनोरंजन क्षेत्रात देखील त्यांचं नाव परिचयाचं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, नायर इंडी बँड्स (Indie Bands) साठी मॅनेजमेंट कंपनी ओएमएल सुरू केली होती. नंतर त्यांनी स्टँडअप कॉमेडी आणि लाइव्ह म्यूझिक शोवर फोकस करायला सुरूवात केली.
ओएमएल म्हणजेट ओन्ली मच लाउडर ही इंटरटेनमेंट आणि इव्हेंट मीडिया कंपनी आहे. विजय नायर याचे सीईओ आणि डायरेक्टर देखील होते. ओएमएल सोबतच विजय नायर यांचे इतरही अनेक कंपन्यांशी संबंध राहिले आहेत. यामध्ये बेबलफीश आणि मदरस्वेयर सारख्या कंपन्यांचा समावेश आहे. याशिवाय वियर्डएस कॉमेडी. मोटरमाउथ रायटर्स आणि रेबेलियन मॅनेजमेंट सारख्या ऑनलाईन गेमिंग, बेटिंग आणि कॉमेडी शो संबंधीत कंपन्यांशी देखील ते संबंधीत आहेत.
सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरनुसार मनीष सिसोदिया यांचे सहकारी अर्जुन पांडे यांनी दारू व्यापारी समीर महेंद्रू यांच्याकडून २ ते ४ कोटी रुपये घतले होते. ही रक्कम विजय नायर यांच्याकडून अर्जुन पांडे यांनी घेतली होती. नंतर नायरने ही रक्कम कथितरित्या मद्य घोटाळ्यात आरोपी बनवण्यात आलेल्या सरकारी अधिकाऱ्यांना दिली.
इतकेच नाही तर असाही आरोप आहे की, विजय नायर यांनी कथितरित्या साउथ ग्रुपकडून १०० कोटी रुपये लाच घेतली. साउथ ग्रुपने ही लाच आम आदमी पक्षाच्या नेत्यांना देण्यासाठी त्यांच्याकडे दिली होती.
डिसेंबर २०२२ मध्ये मद्य घोटाळा प्रकरणात चार्जशीट दाखल केली होती. ज्यामध्ये ईडीने विजय नायर यांना मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या अत्यंत जवळाचा व्यक्ती असल्याचे सांगण्यात आले होते. त्याच वर्षी आरोपी अमित अरोडा यांच्या रिमांड कॉपीमध्ये ईडीने दावा केला होता की आम आदमी पक्षाच्या नेत्यांसाठी विजय नायर आणि दुसऱ्या लोकांना साउथ ग्रुपने १०० कोटींची लाच दिली होती.
विजय नायर यांना ईडी आणि सीबीआय या दोन्ही एजन्सीनी अटक केले होते. या प्रकरणी मागिल महिन्यात ईडीने तेलंगाणाचे माजी मुख्यमंत्री केसीआर यांची मुलगी के कविता यांना देखील अटक केले होते. कविता यांनी १९-२० मार्च २०२१ रोजी वियज नायर यांची भेट घेतल्याचा आरोप आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.