नवी दिल्ली : मोठ्या काळाच्या प्रतिक्षेनंतर अखेर भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीला जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) मान्यता देण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी ट्विटद्वारे याची माहिती दिली.
पीटीआयनं म्हटलं की, "जागतीक आरोग्य संघटनेच्या तांत्रिक सल्लागार गटानं भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीला आपत्कालिन वापराच्या यादीत समाविष्ट केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे" दरम्यान कोव्हॅक्सिन लसीचा आता या यादीत समावेश झाल्यानं जगातील सर्व देशांना कोव्हॅक्सिन लस वापरता येणार आहे. तसेच कोव्हॅक्सिनचे डोस घेतलेल्या नागरिकांना जगभरातील देशांमध्ये येण्या-जाण्यावरील निर्बंध हटवण्यात येऊ शकतात.
केंद्राच्या लसीकरण अभियानामुळं देशाची दोन गटात विभागणी - हायकोर्ट
केंद्राच्या लसीकरण मोहिमेनं देशातील नागरिकांची दोन गटात विभागणी केली आहे. यातील एका गटानं कोविशिल्डची लस घेतली असून हे लोक देश-विदेशात कुठेही विनाअडचण ये-जा करत आहेत. तर दुसऱ्या गटानं कोव्हॅक्सिन लस घेतली आहे, ज्यांच्या अधिकारांचं मात्र हनन होतं आहे, अशी टिप्पणी केरळ हायकोर्टानं नुकतीच एका सुनावणीदरम्यान केली होती. जागतीक आरोग्य संघटनेकडून कोव्हॅक्सिनला मान्यता न मिळाल्याबद्दल ही याचिका दाखल करणाऱ्या व्यक्तीनं तिसऱ्यांदा हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला होता. त्याचं म्हणणं होतं की, कोव्हॅक्सिनला मान्यता न मिळाल्यानं त्याच्या नोकरीवर संकट निर्माण झालं आहे.
आरोग्यमंत्र्यांनी चोवीस तासात मान्यतेचे दिले होते संकेत
आठवड्याभरापूर्वी WHOच्या पत्रकार परिषदेतील मार्गारेट हॅऱिस यांच्या विधानाच्या हवाल्यानं रॉयटर्सनं वृत्त दिलं होतं की, "जर सर्वकाही ठीक राहिलं, समितीतील लोक जर निष्कर्षांवर समाधानी असतील तर कोव्हॅक्सिनला येत्या २४ तासात मंजुरी मिळेल" दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनीही म्हटलं होतं की, "WHO ची एक प्रणाली आहे यामध्ये एक तांत्रिक समिती आहे जी कोव्हॅक्सिनला मंजुरी देईल त्यानंतर दुसऱ्या समितीच्या आजच्या बैठकीनुसार कोवॅक्सिनला मान्यता दिली जाईल."
WHOनं या लसींना दिलीए मान्यता
WHOनं आत्तापर्यंत Pfizer/BioNTech (३१ डिसेंबर २०२०), AstraZeneca/Oxford COVID 19 च्या AstraZeneca-SKBio (कोरिया) आणि AstraZeneca-Serum (भारत) ( १५ फेब्रुवारी २०२१) मंजुरी दिली. तसेच जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या लसीला १२ मार्च २०२१ रोजी तर चीनच्या सिनोफार्मच्या कोरोना प्रतिबंधक लसीलाही आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे. या यादीत आता भारत बायोटेकच्या 'कोव्हॅक्सिन' लसीचाही समावेश झाला आहे.
दरम्यान, भारतात DCGAनं कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोन लसींना जानेवारी २०२१ रोजी आपत्कालिन वापरासाठी मान्यता दिली होती. २ ते १८ वयोगटातील मुलांसाठी कोव्हॅक्सिन लसीला DCGA नं मान्यता दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.