Crime News: भाजपचा नेत्या सना खान कोण होत्या? त्यांना नवऱ्याने का मारलं?

मध्य प्रदेश पोलिसांनी भारतीय जनता पक्षाच्या नेता सना खान यांची हत्या करणाऱ्या अमित साहू उर्फ पप्पू याला अटक केली आहे.
sana khan
sana khanesakal
Updated on

जबलपूर- मध्य प्रदेश पोलिसांनी भारतीय जनता पक्षाच्या नेता सना खान यांची हत्या करणाऱ्या अमित साहू उर्फ पप्पू याला अटक केली आहे. अमित साहू हा सना खान यांचा पती असून पैसे आणि इतर काही खाजगी कारणासाठी त्यांची हत्या केली असल्यासं त्याने कबुल केलंय.सना खान यांच्या डोक्यात काठी घालून मारल्याचं अमित साहूने पोलिसांना सांगितलं. तसेच सना यांचा मृतदेह जिल्ह्यातील हिरेन नदीत फेकूल दिले असल्याचं त्याने सांगितलंय. (Who was BJP leader sana Khan and why was she killed by husband amit sahu)

अमित साहू याला जबलपूरच्या गोराबाजार येथून शुक्रवारी अटक करण्यात आली. मध्य प्रदेश आणि नागपूर पोलिसांनी एकमेकांच्या सहयोगाने ही कारवाई केलीये. अमित साहू जबलपूरमध्ये एक धाबा चालवतो. सना खान यांना चारवेळा डोक्यात काठीने मारल्यानंतर त्यांचा मृतदेह जिल्ह्यातील हिरेन नदीमध्ये त्याने फेकला. या कामात त्याला त्याच्या नोकरानेही मदत केली होती. पोलिस अधिक्षक कमल मोर्य यांनी दिलेल्या माहितीनुसार सना खान यांचा मृतदेह मोरगाव गावाजवळ भेलखेडा पोलिस स्टेशनच्या हद्दीत हिरेन नदीत फेकण्यात आलाय. मृतदेह अद्याप सापडलेला नसून शोध सुरु आहे.

sana khan
NCERT चा अभ्यासक्रम ठरवण्याच्या नव्या समितीत सुधा मूर्ती, शंकर महादेवन

२ ऑगस्ट नंतर होता फोन बंद

माहितीनुसार, सना खान २ ऑगस्ट रोजी जबलपूरला गेल्या होत्या, त्यानंतर त्या बेपत्ता होती. त्यांच्या कुटुंबियांनी जबलपूरमध्ये येऊन शोध घेतला, पण त्यांचा काही पत्ता लागला नाही. सना खान खाजगी बसने जबलपूरला आल्या होत्या. त्यांनी आपल्या आईला एकदा फोन केला, त्यानंतर त्यांचा फोन बंद लागत होता. त्यानंतर सना खान यांच्या आईने पोलिसात तक्रार दाखल केली. नागपूर पोलिसांनी यानंतर शोध सुरु केला. ४ ऑगस्ट रोजी पोलिस जबलपूरला आले होते. सना खान यांच्या शेवटच्या ठिकाणानुसार त्या जबलपूरमधील त्यांच्या घरी होत्या.

sana khan
New Bill: लग्न किंवा नोकरीचे आमिष दाखवून महिलेशी संबंध ठेवल्यास होणार 'इतके' वर्षे तुरुंगवास

सना खान आणि अमित साहू यांच्यात आर्थिक बाबीवरुन कडाक्याचे भांडण झाले. संतापलेल्या अमित साहूने घरात पडलेली एक काठी सना खान यांच्या डोक्यात मारली. तब्बल चारवेळा डोक्यात मारल्यानंतर सना खान यांचा मृत्यू झाला. ही सर्व घटना घडत असताना घरचा नोकर तेथेच होता. अमित साहूने नोकराच्या मदतीने सना खान यांचा मृतदेह गाडीत टाकला आणि तो नऊ किलोमीटर दूर नदीत नेऊन फेकला.

भाजपच्या नेता सना खान कोण होत्या?

३४ वर्षीय सना खान या नागपूरमधील भारतीय जनता पक्षाच्या नेता होत्या. त्या पूर्व महाराष्ट्रात अल्पसंख्याक सेलमध्ये काम करत होत्या. सना खान यांच्या सोशल मीडिया हँडलवर त्यांचे भाजपच्या अनेक नेत्यांसोबत फोटो दिसत आहेत. सना खान यांच्या आई मेहरुनिसा या नागपूरातील अवस्थी नगरच्या रहिवाशी आहेत. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.