Hardeep Singh Nijjar : कोण होता हरदीप सिंग निज्जर? हत्येच्या आरोपांमुळे भारत-कॅनडामध्ये वाढलं टेन्शन

Who was Hardeep Singh Nijjar khalistani terrorist justin trudeau Canadian Parliament
Who was Hardeep Singh Nijjar khalistani terrorist justin trudeau Canadian Parliament
Updated on

भारत आणि कॅनडा या दोन देशात सध्या तणावाचं वातावरण असून कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रू़डो यांनी गंभीर आरोप केले आहेत. 'खलिस्तानी टायगर फोर्स' म्हणजेच केटीएफचा दहशतवादी हरदीप सिंग निज्जर हा या आरोपांचे कारण ठरला आहे.

जूनमध्ये वाँटेड खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येप्रकरणी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी भारतावर केलेल्या आरोपांमुळे दोन्ही देशांदरम्यान नव्याने तणाव निर्माण झाला आहे.

खलिस्तानी दहशतवादी निज्जरची जून महिन्यांत हत्या करण्यात आली होती. आता कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी निज्जर याच्या हत्येत भारताचा हात असल्याची शंका व्यक्त केली आहे. निज्जरवर 10 लाख रुपयांचे बक्षिस देखील ठेवण्यात आले होते. विशेष म्हणजे यापूर्वी लंडन येथील एका रुग्णालयात आणखी एका खालिस्तानी नेता अवतार सिंह खांडा याचा देखील मृत्यू झाला होता.

Who was Hardeep Singh Nijjar khalistani terrorist justin trudeau Canadian Parliament
Canada: पंतप्रधान ट्रुडो कॅनडाच्या संसदेत आक्रमक! खलिस्तानी निज्जरच्या हत्येत भारताचा हात असल्याचा आरोप

कौन होता हरदीप सिंग निज्जर?

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, निज्जर पंजाब येथील जालंधरच्या भारसिंघपूर गावातील रहिवासी होता. नॅशनल इन्वेस्टिगेशन एजेंसी(NIA)ने आपल्या कागदपत्रात कॅनडा येथील पत्ता 8193, 143-ए स्ट्रीट, सरी बीसी, कॅनडा आणि 1418, 142 स्ट्रीट, 71 अव्हेन्यू (ब्रिटिश कोलंबिया) या दोन्हींचा समावेश केला होता. खांडा आणि निज्जर यांनी भारतीय उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने केल्याचे सांगितले जाते. सोबतच दोघांचा भारतात दहशतवादी हल्ल्यात देखील सहभाग होता.

NIAने जालंधर येथे 2021 मध्ये एका हिंदू पुजाऱ्यावर हल्ला केल्याच्या प्रकरणात निज्जर याच्याबद्दल माहिती देणाऱ्याला मागच्या वर्षी जुलै मध्ये 10 लाख रुपयांचे बक्षिस जाहीर खेलं होतं. याच्या तीन महिने आधी एनआयएने हल्ल्याप्रकरणी त्याच्या आणि इतर तीन जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले होते.

Who was Hardeep Singh Nijjar khalistani terrorist justin trudeau Canadian Parliament
Ganesh Chaturthi Wishes : 'गणपती बाप्पा मोरया' गणेश चतुर्थीच्या सर्वांना पाठवा खास शुभेच्छा

तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, निज्जर भारतात खलिस्तान समर्थक गट 'शिख्स फॉर जस्टिस' यांच्या फुटीरतावादी आणि हिंसक अजेंड्याला प्रोत्साहन देत होता. यासोबतच त्याने दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नू आणि परमजीत सिंह पम्मा यांच्या सोबत 'शिख्स फॉर जस्टिस' च्या अंतर्गत काम केलं आहे. 'एसएफजे'वर केंद्रीय गृहमंत्रालयाने 2019 साली बंदी घातली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.