Himachal Pradesh: आता सुरू झाली खरी लढाई, हिमाचलमध्ये मुख्यमंत्रीपदाचे तीन उमेदवार

1985 पासून हिमाचल प्रदेशात दर पाच वर्षांनी सरकार बदलते
Himachal Pradesh
Himachal PradeshEsakal
Updated on

1985 पासून हिमाचल प्रदेशात दर पाच वर्षांनी सरकार बदलते. आता हाच कल यंदाही कायम राहतो की भाजप सरकारमध्ये परत येऊन तो मोडतोड करणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. दोन्ही पक्षांतून मुख्यमंत्रिपदाचे प्रमुख दावेदार कोण? भारतीय जनता पक्षाने पुन्हा सरकार स्थापन केले तर जयराम ठाकूर यांच्याशिवाय मुख्यमंत्रीपदाचा दावा कोण मांडू शकेल? बहुमत मिळाल्यानंतर काँग्रेस सत्तेच्या चाव्या कोणाकडे सोपवणार?

भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली आहे. अशा स्थितीत भाजप पुन्हा सत्तेत आल्यास जयराम ठाकूर हे प्रबळ दावेदार असतील. जयराम यांनी सेरज विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. हिमाचल प्रदेश विधानसभेत ते पाच वेळा आमदार राहिले आहेत. 1998 पासून सतत जिंकत आहे. भाजपची सत्ता आल्यास जयराम ठाकूर यांच्याशिवाय केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हेही दावेदार होऊ शकतात. 2024 च्या लोकसभा निवडणुका पाहता अनुराग ठाकूर यांनाही सत्ता मिळू शकते.

Himachal Pradesh
HImachal Pradesh: विनोद तावडेंचा धसका? कॉंग्रेसकडून नेत्याना सुरक्षित स्थळी हलवण्याची तयारी सुरू

काँग्रेस कडून 1) मुकेश अग्निहोत्री 2)सुखविंदर सिंह सुक्खू 3)प्रतिभा सिंह या नावांची चर्चा सुरू आहे. हिमाचल प्रदेश येथील एकंदरीत परिस्थिति पाहता काँग्रेसची सत्ता येणार हे दिसून येत आहे. परंतु मुख्यमंत्री पदावर कोण बसणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Himachal Pradesh
Himachal Election Results : हिमाचल 'त्रिशंकू' झालं तर काय, कोणाचं सरकार स्थापन होणार?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.