डोक्यावर पदर घेऊन मंदिरांची वारी करणाऱ्या सोनिया गांधींनी अयोध्येत जाण्यास का दिलाय नकार?

काँग्रेस पक्षाने स्पष्ट केलं आहे की, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी आणि लोकसभेतील विरोधीपक्ष नेते रंजन चौधरी २२ जानेवारी रोजी अयोध्या येथील श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जाणार नाहीत.
why Congress Leader Sonia Gandhi refuse to go ram mandir pratishtha samaroh ayodhya marathi news
why Congress Leader Sonia Gandhi refuse to go ram mandir pratishtha samaroh ayodhya marathi news
Updated on

काँग्रेस पक्षाने स्पष्ट केलं आहे की, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी आणि लोकसभेतील विरोधीपक्ष नेते रंजन चौधरी २२ जानेवारी रोजी अयोध्या येथील श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जाणार नाहीत. यानंतर सर्वाधिक टीकेचा सामना सोनिया गांधी यांना करावा लागत आहे. त्यांना हिंदू विरोधी म्हटलं जात आहे. इतकेच नाही तर सोशल मीडियावर इतरही अनेक आरोप केले जात आहेत. अनेकांनी त्यांना हिंदू विरोधी आणि हिंदू देवी-देवतांविरोधीत देखील म्हटलं आहे.

खरंच सोनिया हिंदू विरोधी आहेत?

तर असे काही नाहीये, १९६८ साली राजीव गांधी यांच्यासोबत लग्न झाल्यानंतर सोनिया गांधी भारतात राहायला आल्या, तेव्हा त्यांच्या सासू इंदिरा गांधी या त्यांना १९७९ साली गुजरातमधील प्रसिद्ध अंबाजी मंदिरात घेऊन गेल्या होत्या. त्यावेळी इंदिरा गांधी या त्यांच्या राजकीय करियरमधील सर्वात वाईट काळातून जात होत्या. १९८० मध्ये लोकसभा निवडणूकीपूर्वी इंदिरा गांधी यांना त्यांच्या सुनेला सोबत घेऊन मंदिरात जाणं फायद्याचं ठरलं होतं. इंदिरा गांधी तेव्हा ५३१ पैकी ३५३ जागा जिंकून सत्तेत परत आल्या होत्या, तेव्हा मोरारजी देसाई यांचं सरकार होतं.

लग्नानंतर डोक्यावर पदर घेऊन वावरणाऱ्या सोनिया गांधी या १९८९ मध्ये त्यांचे पती पंतप्रधान राजीव गांधी यांच्यासोबत दुसऱ्यांदा त्याच मंदिरात गेल्या होत्या. मात्र तेव्हा निवडणूकीत काँग्रेसचा पराभव झाला होता आणि राजीव गांधी यांचं सरकार सत्तेतून गेलं होतं. १९८९ च्या निवडणूकीत देशात दुसऱ्यांदा काँग्रेस व्यतिरीक्त दुसऱ्या पक्षाचं सरकार स्थापन झालं होतं. तेव्हा व्हीपी सिंह पंतप्रधान बनले होते, त्यांना भाजपने पाठिंबा दिला होता.

why Congress Leader Sonia Gandhi refuse to go ram mandir pratishtha samaroh ayodhya marathi news
Shinde Vs Thackeray : 'उद्धव ठाकरेंच्या हातून AB Form का घेतला बरं?' ठाकरे सेनेचं एकनाथ शिंदेंना प्रत्युत्तर

१९८९ मध्ये निवडणूक काळात सोनिया गांधी राजीव गांधी यांच्यासोबत उत्तर प्रदेशातील वृंदावन येथील आश्रमात देवराह बाबा यांचे आशीर्वाद देखील घेतले होते. देवराह बाबा जमीनीपासून सहा फूटांवर बनवलेल्या लाकडी मचानीवर बसत असत आणि आपल्या खास अंदाजात लाथ मारून आशीर्वाद देखील द्यायचे. राजीव आणि सोनिया गांधी यांनी तेव्हा त्यांचे आशीर्वाद घेतले होते.

१९९८ मध्ये लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रचारावेळी सोनिया गांधी आंध्र प्रदेशातील तिरुपती येथील बालाजी मंदिरात देखील दर्शनासाठी गेल्या होत्या. तेव्हा काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष देखील सोनिया गांधीच होत्या. त्यांच्या तिरूपती दर्शनानंतर काँग्रेसच्या कार्य समितीने एक प्रस्ताव मंजूर केला, ज्यामध्ये हिंदू धर्म भारतात धर्मनिरपेक्षतेची सर्वात मोठी गॅरंटी असल्याचे म्हटले होते.

why Congress Leader Sonia Gandhi refuse to go ram mandir pratishtha samaroh ayodhya marathi news
Uddhav Thackeray : 'हा निकाल फक्त औपचारिकता...'; प्रकाश आंबेडकरांनी ठाकरेंबद्दल व्यक्त केली सहानुभूती

राशिद किदवई यांनी इंडिया टुडेमध्ये लिहीलेल्या एका लेखात याचा उल्लेख करताना सांगितलं आहे की, जेव्हा तिरुमला तिरुपती देवस्थान येथे दर्शनासाठी अध्यक्ष सुब्बिरमी रेड्डी हे सोनिया गांधींना घेऊन गेले, तेव्हा त्यांना मोठा विरोध करण्यात आला होता. किदवई यांच्यानुसार तेव्हा सोनिया गांधी यांनी मंदिराच्या डारीमध्ये लिहीले होते की त्या पती आणि सासू यांच्या धर्माचं पालन करतात.

११९९ मध्ये जेव्हा १३ महिन्यानंतर पुन्हा लोकसभा निवडणूका होत होत्या तेव्हा भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सोनिया गांधी यांच्या धर्माचा मुद्दा उपस्थित केला होता. संघ परिवाराने तेव्हा 'राम राज्य' विरुद्ध 'रोम राज्य' हा मुद्दा उपस्थित केला होता. तेव्हा रोमन कॅथलिक असोसिएशनने निवेदन जारी करत, सोनिया गांधी ख्रिश्चन धर्माचे पालन करत असल्याचे नाकारले होते. त्या पोटनिवडणुकीत भाजपचा विजय झाला होता आणि तिसऱ्यांदा अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात एनडीएचे सरकार स्थापन झाले, जे पहिल्यांदाच पाच वर्ष टिकले होते.

मग अयोध्येला जाण्यास नकार का?

काँग्रेस पक्षाचे म्हणणे आहे की अयोध्या येथे २२ जानेवारी रोजी आयोजित कार्यक्रम हा भाजप आणि संघ परिवारचा राजकीय कार्यक्रम आहे. ज्याचा उद्देश हा लोकसभा निवडणुकीत हिंदू मतदारांचे धुर्वीकरण करणे हा आहे. म्हणून काँग्रेस पक्षाने या कार्यक्रमात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे असे सांगण्यात आले आहे. दरम्यान काँग्रसच्या या निर्णयानंतर सर्व स्तरातून प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.