Dog Aggression: माणसाचे मित्र म्हणवणारे कुत्रे माणसावरच हल्ला का करतात, माहितीये?

कुत्र्यांच्या वागणुकीचा अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांच्या मते कुत्रे कधीच अचानक चावत नाही. जर कुत्र्यांना त्यांच्या क्षेत्रात कोणी अलेले आवडले नाही तर ते त्यांच्या बॉडीलँग्वेजने संकेत देतात.
Dog Aggression
Dog Aggressionesakal
Updated on

कुत्रा माणसाचा बेस्ट फ्रेंड म्हणून सगळ्यांना माहित आहे. पण हे मोहक, लाघवी, प्रेमळ कुत्रे इतर प्राण्यांसारखे आक्रमक पण होतात हे देखिल सत्य आहे. आणि जर त्यांना माणसांपासून धोका वाटत असेल तर त्यांच्यावर आक्रमण पण करतात. हे पाळीव व मोकाट कुत्रे दोघांना लागू होते.

Dog Aggression
कुत्रा चावला म्हशीला अन् इंजेक्शन घेण्यासाठी गावकऱ्यांची पळापळ

काही आठवड्यांपूर्वी लखनौमधल्या ८२ वर्षांच्या सुशिला त्रिपाठी नावाच्या एका ज्येष्ठ महिलेवर त्यांच्या पाळीव कुत्र्याने हल्ला केला. त्या घराच्या छतावर असताना हा हल्ला झाला होता. नंतर स्थानिक लोकांना रक्ताच्या थारोळ्यात त्यांची बॉडी मिळाली.

Dog Aggression
Viral Video: चक्क 5 स्टार हॉटेलमध्ये काम करतो 'हा' कुत्रा; दर महिन्याला मिळतो खास पगार

तसेच मागच्या महिन्यात सुरतमध्ये १३ माणसांवर कुत्र्यांनी हल्ला केला. ज्यात १० वर्षांखालील ८ मुलांचा समावेश होता. ही मुले पावसात खेळत असताना रोज दिसणारा कुत्रा दिसला, जो नेहमीपेक्षा वेगळा वागत होता. त्या कुत्र्याने ३ महिला व २ पुरूषांना चावले होते. ही मुले त्याच्या जवळ गेले तेंव्हा कुत्रा त्यांच्यावर भूंकला आणि चावला.

Dog Aggression
जर तुमचा कुत्रा Google वापरतो तर तो Internetवर काय सर्च करणार?

एका अभ्यासात असे निदर्शनास आले आहे की, रोज ५ हजार लोकांवर कुत्रे आक्रमण करतात. ही आक्रमणे टाळण्यासाठी कुत्रे आधी काही संकेत देतात ते ओळखावे असे सरकारी यंत्रणेद्वारा सांगण्यात येते.

Dog Aggression
कुत्रा भुंकल्याच्या रागातून शेजाऱ्यावर रॉडने हल्ला, Video Viral

तज्ज्ञांच्या मते कुत्रे चावण्याचे नेमके कारण सांगणे शक्या नसते. भटक्या कुत्र्यांचे आक्रमक होण्यामागचे कारण सांगणे फार कठीण आहे. कारण ते त्यांच्या जन्मापासूनच जगणे, अन्न, पाणी, त्रास अशा अनेक गोष्टींचा सामना करत असतात. बऱ्याचदा कुत्रे ६ वर्षांखालील मुलांना किंवा ज्येष्ठ नागरिकांना अधिक चावतात.

Dog Aggression
लिफ्टमध्येच कुत्रा चावल्याने मालकीणीविरोधात गुन्हा

बहुतेकदा कुत्र्यांना असुरक्षितता किंवा धोका जाणवल्याने आक्रमण करतात. ते स्वतःचा किंवा त्यांच्या पालकांचा बचाव करण्यासाठी, कोणीतरी अचानक त्यांच्याकडे आले किंवा त्यांच्यावर गंभीर अत्याचार, आघात झाला तर आक्रमक होतात. तसेच त्यामना झालेल्या दुखापत किंवा रोगामुळे होणाऱ्या वेदनांमुळे ते चावू शकतात, असे पेट डॉक्टरांचे म्हणने आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.