डोळ्यांचा चष्मा घालवण्याचा दावा करणाऱ्या आय ड्रॉप वर भारतीय बाजारात उपलब्ध होण्याआधीच बंदी घालण्यात आली आहे. कंपनीने दाव केला होता की, या आय ड्रॉपच्या वापराने दृष्टीदोष दूर होऊन तुमचा चष्मा कायमचा सुटण्यास मदत होईल, विशेष म्हणजे ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) या औषधाला मान्यता देखील दिली होती. मात्र केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेकडून (CDSCO) मायोपिया व हायपरमेट्रोपिया दूर करण्याचा दावा करणाऱ्या या आय ड्रॉपवर पुढील नोटिस येईपर्यंत बंदी घालण्यात आली आहे.