Corona - भारतात एका दिवसात 6 हजार मृत्यू कसे?

Corona - भारतात एका दिवसात 6 हजार मृत्यू कसे?
Updated on
Summary

गेल्या 24 तासात अचानक 6 हजार 148 इतक्या मृत्यूची नोंद झाल्यानं खळबळ उडाली आहे. अचानक वाढलेल्या या आकडेवारीने आतापर्यंत देशातील सर्वाधिक मृत्यूचा उच्चांक नोंदवला गेला.

नवी दिल्ली - सध्या भारत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असून गेल्या दोन ते तीन आठवड्यात नव्या रुग्णंसख्येत घट बघायला मिळाली आहे. दरम्यान, गेल्या 24 तासात अचानक 6 हजार 148 इतक्या मृत्यूची नोंद झाल्यानं खळबळ उडाली आहे. अचानक वाढलेल्या या आकडेवारीने आतापर्यंत देशातील सर्वाधिक मृत्यूचा उच्चांक नोंदवला गेला. इतक्या मृत्यूची नोंद होण्याचं कारण म्हणजे बिहारने त्यांच्या नोंद न केलेल्या मृत्यूची माहिती बुधवारी अपडेट केली. बिहारने बुधवारी 3 हजार 951 मृत्यू झाल्याची माहिती दिली. बिहारमधील मृत्यूचा आकडा वगळल्यास 2 हजार 197 इतका होतो.

गेल्या वर्षी कोरोनाची सुरुवात झाल्यापासूनच बिहारमध्ये 7 लाख 15 हजार 179 इतक्या जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील पाच लाखांहून जास्त जण काही महिन्यांपूर्वीच कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. आरोग्य विभागाने कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या नव्याने जाहीर केली. याआधी मंगळवारी 7 लाख 1 हजार 234 इतके रुग्ण कोरोनामुक्त झाल्याचं म्हटलं होतं. मात्र बुधवारी हीच आकडेवारी 6 लाख 98 हजार 397 अशी असल्याचं सांगितलं.

Corona - भारतात एका दिवसात 6 हजार मृत्यू कसे?
बिहारच्या कोरोना आकडेवारीत हेराफेरी; 24 तासांत मृत्यू वाढले 73 टक्क्यांनी

आकडेवारीच्या य़ा गोंधळात बिहारमध्ये कोरोना मृत्यूचा आकडा 5 हजार 458 वरून थेट 9 हजार 429 वर पोहोचला. बिहारने जारी केलेल्या नव्या आकडेवारीनंतर देशात सर्वाधिक मृत्यूची नोंद असलेल्या राज्यांच्या यादीमध्ये 17 व्या क्रमांकावरून 12 व्या स्थानी पोहोचले आहेत. नव्या आकडेवारीनुसार बिहारमध्ये मृत्यूच्या प्रमाणात 42.1 टक्क्याने वाढ झाली.

देशात फक्त बिहारमध्येच नाही तर इतर राज्यातही मृत्यूच्या आकडेवारीत असा बदल दिसतो. महाराष्ट्रानेही जवळपास 5 हजार मृत्यूचे आकडे गेल्या 12 दिवसात नोंदवले आहेत. दररोज जारी करण्यात येणाऱ्या आकडेवारीमध्ये आधीच्या दोन दिवसांचे आणि आठवड्याभरातील मृत्यूचा आकडाही आरोग्य विभागाकडून सांगण्यात येतो. 17 मे ते 28 मे या कालावधीत 11 हजार 712 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यापैकी 6 हजार 622 हे डेली अपडेटमधील आहेत तर 5 हजार 90 मृत्यू हे जुन्या डेटा अपडेटमधील आहे. तांत्रिक त्रुटीमुळे किंवा अखेरच्या क्षणी डेटा अपडेट न केलेल्या मृत्यूच्या आकडेवारीमुळे असा फरक पडत असल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.