भारतीय वायुसेनामध्ये फ्लाइंग कॉफिनच्या नावाने फेमस असलेले मिग-21 विमान क्रॅश झाले. गुरुवारी रात्री राजस्थानच्या बाडमेरमध्ये मिग-21 विमानाचा अपघात झाला. या अपघातात देशाने दोन प्रतिभावान पायलटला गमावले.
या दुर्घटनेनंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लोकांनी पुन्हा एकदा मिग-21 विमानाच्या विश्वसाहर्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. (why indian air force uses MIG 21 jet which is more than 50 years old)
रशियाच्या मिकोयान कंपनी द्वारा या विमानाला 1955 या वर्षी बनविण्यात आले होते. भारतीय वायुसेनामध्ये 1963 मध्ये या विमानाला सहभागी करण्यात आले. भारताने एकूण 874 मिग-21 विमानांना विकत घेतले. सध्या वायुसेना याच्या अपग्रेडेड वर्जन मिग-21 बायसनचा प्रयोग करणार आहे.
भारताची हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) या विमानाला लायसेंसद्वारे अपग्रेड करते. हे विमान अनेकदा अपघाताचे शिकार झाले आहे आणि या विमानांमुळे अनेक उत्तम पायलटांना आपला जीव गमवावा लागलाय. यामुळेच 50 वर्षांपेक्षा जुने मिग-21 विमान का आताही वापरतात? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
स्क्वाड्रनची कमतरता
भारतीय वायुसेनाच्या लढाऊ विमानांनाच्या संग्रहातून सर्वात जुना मिग-21 आहे. याचा आताही वापर करण्यामागील मुख्य कारण म्हणजे वायुसेनेच्या स्क्वाड्रनची संख्या कमी असणे. सोप्या भाषेत वायुसेनामध्ये स्क्वाड्रन विमानांच्या एका समूहाला संबोधले जाते. एक स्क्वाड्रन मध्ये जवळपास 16 ते 18 विमान असतात. मिग-21च्या चार स्क्वाड्रनमध्ये जवळपास 64 विमान असतात.
वायुसेनाकडून या वर्षी 30 सप्टेंबरला मिग-21 बायसनचे एक स्क्वाड्रन रिटायर होणार. या विमानांचे सर्व स्क्वाड्रन 2025 पर्यंत रिटायर होणार,ॉ.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.