राष्ट्रपतीपदाची निवडणूक इतर निवडणुकांपेक्षा वेगळी असते.
निवडणूक आयोगाने राष्ट्रपती निवडणुकीची घोषणा केल्यानंतर 15 जूनपासून निवडणूक प्रक्रियेला सुरूवात झाली. दरम्यान, राष्ट्रपती निवडणुकीसाठी 18 जुलै रोजी मतदान झाले असून 21 जुलै रोजी म्हणजेच आज निकाल जाहीर होणार आहे. राष्ट्रपतीपदाची निवडणूक इतर निवडणुकांपेक्षा वेगळी असते. इतर सर्व निवडणुकांप्रमाणे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे मतदान होत नाही. याची प्रक्रिया ठरलेली असते. मात्र तुम्हाला माहिती आहे का? नवीन राष्ट्रपती 25 जुलैलाच का शपथ घेतात?
इतर सर्व निवडणुकांप्रमाणे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचे मतदान होत नाही. निवडणूक आयोगाकडून मतदारांना खास पेन दिले जातात. मतदाराला त्याच पेनाने उमेदवारांसमोर क्रमांक लिहायचा असतो. त्याला सर्वाधिक पसंतीच्या उमेदवाराच्या नावासमोर नंबर लावायचा असतो. आयोगाने दिलेले विशेष पेन वापरले नाही तर त्यांचे मत अवैध ठरते.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत लोकसभा, राज्यसभा आणि राज्यांच्या विधानसभांचे सदस्य मतदान करतात. राज्यसभेच्या 245 सदस्यांपैकी केवळ 233 खासदार मतदान करू शकतात. या निवडणुकीत 12 नामनिर्देशित खासदार मतदान करत नाहीत. यासह लोकसभेचे सर्व 543 सदस्य मतदानात सहभागी होतात.
या निवडणुकीत आमदार आणि खासदाराच्या मताचे मूल्य ठरवले जाते. खासदाराच्या मताचे मूल्य ७०८ आहे. त्याचवेळी, आमदारांच्या मताचे मूल्य त्या राज्याची लोकसंख्या आणि जागांच्या संख्येवर अवलंबून असते.
देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशातील एका आमदाराच्या मताचे मूल्य सर्वाधिक २०८ इतके आहे. त्याचवेळी, झारखंड आणि तामिळनाडूमधील एका आमदाराच्या मताचे मूल्य 176 आणि महाराष्ट्रातील आमदाराच्या मताचे मूल्य 175 आहे.
बिहारच्या एका आमदाराच्या मताचे मूल्य 173 तर सिक्कीमच्या आमदारांना सर्वात कमी किंमत आहे. येथील आमदाराच्या मताचे मूल्य फक्त सात आहे. यानंतर अरुणाचल आणि मिझोरामच्या आमदारांचा क्रमांक येतो. येथील एका आमदाराच्या मताचे मूल्य फक्त आठ आहे.
खासदारांच्या मतांची किंमत काय असते?
245 राज्यसभा खासदारांपैकी 233 राष्ट्रपती निवडणुकीत मतदान करतात. तर लोकसभेत 543 खासदार मतदान करतात. राज्यसभा आणि लोकसभा सदस्यांच्या एका मताची किंमत 700 आहे. दोन्ही सभागृहातील सदस्यांची संख्या ७७६ आहे. या अर्थाने, खासदारांच्या सर्व मतांचे मूल्य 5,43,200 आहे. तर विधानसभा सदस्य आणि खासदारांच्या मतांचे एकूण मूल्य बघितले तर ते १० लाख ८६ हजार ४३१ होते. म्हणजे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत इतकी मते असतात.
नवीन राष्ट्रपती 25 जुलैलाच का शपथ घेतात?
दर पाच वर्षांनी 25 जुलै रोजी देशाला एक नवीन राष्ट्रपती मिळतो. ही मालिका 1977 पासून सुरू झाली जेव्हा तत्कालीन राष्ट्रपती फकरुद्दीन अली अहमद यांचे त्यांच्या कार्यकाळात फेब्रुवारी 1977 मध्ये निधन झाले तेव्हा त्यांच्या निधनानंतर उपाध्यक्ष बी.डी.जत्ती हे कार्यवाहक राष्ट्रपति अध्यक्ष झाले. त्यानंतर नीलम संजीव रेड्डी 25 जुलै 1977 ला राष्ट्रपती बनले. तेव्हापासून दर पाच वर्षांनी 25 जुलै रोजी राष्ट्रपतींची निवड होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.