भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने चांद्रयान ३ च्या विक्रम लँडरला ४० सेंटीमीटरपर्यंत वर उचललं आणि त्यानंतर पुढे ३०-४० सेंटिमीटरवर अलगदपणे लँड केलं. इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, लँडरने या आधीच्या लँडिंगच्या ठिकाणी म्हणजे शिवशक्ती पॉईंटपासून ३०-४० सेंटिमीटर अंतरावर सुरक्षितपणे लँडिंग केली. पण अशा प्रकारे दोन वेळा का लँडिंग करण्यात आली? आत्तापर्यंत काय काय घडलं जाणून घ्या १० मुद्द्यांमध्ये...
१४ जुलै रोजी आंध्र प्रदेशातल्या श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ स्थानकावरुन LVM3 रॉकेट लाँच करण्यात आलं. भारताच्या या चांद्रयानाने २३ ऑगस्ट रोजी आपल्या नियोजित स्थळी यशस्वीपणे लँडिंग केली. या लँडिंगच्या ठिकाणाला शिवशक्ती पॉईंट असं नाव देण्यात आलं.
इस्रोने सांगितलं की काही सेंटिंमीटर लँडर वर उचलून पुन्हा खाली आणणं या प्रयोगाला हॉप एक्सपेरिमेंट म्हणतात. हा प्रयोग यशस्वी झाला आहे. इस्रोने पुढे सांगितलं की, या प्रयोगामुळे भविष्यात जेव्हा हे यान परत येईल तेव्हा त्याच्या साहाय्याने पुढे मानव मोहिमा पाठवण्याचा अभ्यासही करता येईल.
या हॉप एक्सपेरिमेंटमध्ये सर्व घटकांनी योग्य पद्धतीने काम केलं आहे. प्रयोगानंतर सर्व उपकरणांना पुन्हा पूर्ववत करण्यात आलं.
लँडरवर असलेल्या उपकरणांपैकी एकाने चंद्राच्या पृष्ठभागावरच्या नैसर्गिक हालचालींचीही माहिती घेतली आहे. चांद्रयान ३ च्या लँडरमध्ये तीन पेलोड आहेत. पहिलं - रंभा एल पी - याचं काम आहे की पृष्ठभागावरील प्लाझ्माची घनता आणि काळाप्रमाणे याच्यामध्ये होणाऱ्या बदलांची नोंद करणे. दुसऱ्या उपकरणाचं काम आहे की धृवीय क्षेत्राजवळच्या चंद्राच्या पृष्ठभागावरच्या वैशिष्ट्यांची माहिती मिळवणे. आणि तिसऱ्या उपकरणाचा उपयोग लँडिंग ठिकाणाच्या आसपास होणाऱ्या वातावरणीय बदलांची, चंद्राचं आवरण, त्याची संरचना यांचा अभ्यास करणे.
सध्या इस्रोने कोणतंही मानव मोहीम करण्याचं नियोजन केलेलं नाही. या ऐवजी आता इस्रो गगनयानावर लक्ष केंद्रित करून आहे. याचा उद्देश तीन दिवसांच्या मोहिमेसाठी तीन सदस्यांच्या एका गटाला ४०० किलोमीटरच्या कक्षेमध्ये सोडणे आणि त्यांना यशस्वीरित्या परत आणून माणसाच्या अंतराळ उड्डाणाच्या क्षमतांचं प्रदर्शन करणे असा आहे.
स्पेस एजन्सीने लिहिले आहे की त्याचे महत्त्व काय आहे? : या प्रक्रियेमुळे चंद्रावर मानवी मोहिमेची आशा वाढली आहे. 'विक्रम' ची यंत्रणा व्यवस्थित काम करत आहेत आणि चांगल्या स्थितीत आहेत, लँडरवरील रॅम्प आणि उपकरणे बंद करण्यात आली आणि प्रयोगानंतर यशस्वीरित्या पुन्हा तैनात करण्यात आली.
चांद्रयान-३ च्या रोव्हर 'प्रज्ञान' ने चंद्राच्या पृष्ठभागावर आपलं काम पूर्ण केलं आहे आणि आता ते निष्क्रिय (स्लीप मोड) अवस्थेत गेलं आहे. याच्या काही तासांपूर्वी इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी सांगितलं होतं की चंद्रावर पाठवलेलं चांद्रयान-3 चे रोव्हर आणि लँडर योग्यरित्या काम करत आहेत आणि चंद्रावर रात्र असल्याने ते "निष्क्रिय" केले जातील.
चीनची चंद्र शोध मोहीम, Chang'e 6, जी २०२४ मध्ये प्रक्षेपित होणार आहे. नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (NASA) कडे आर्टेमिस प्रोग्राम आहे, ज्याचा उद्देश १९७२ मध्ये अपोलो १७ मोहिमेनंतर प्रथमच चंद्रावर मानवी उपस्थिती पुन्हा स्थापित करणं आहे. आर्टेमिस III ही एक क्रू चांद्र शोध मोहीम असेल, परंतु २०२५ पूर्वी ही मोहीम अपेक्षित नाही, कारण आर्टेमिस II नोव्हेंबर २०२४ साठी नियोजित आहे.
२३ ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर चांद्रयान-३ च्या 'विक्रम' लँडरच्या सॉफ्ट लँडिंगनंतर भारताने इतिहास रचला आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचणारा भारत हा चौथा आणि दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा पहिला देश ठरला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.