२१ मे रोजी मनीष सिसोदिया यांना दिल्ली हाय कोर्ट आणि राउड अव्हेन्यू कोर्ट या दोन्हीकडून दिलासा मिळाला नाही. कनिष्ठ कोर्टात जामीन न मिळाल्याने सिसोदिया हायकोर्टात गेले होते, मात्र तेथे देखील त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आणि राउज अव्हेन्यू कोर्टाकडून मनीष सिसोदिया यांची न्यायालयीन कोठडी ३१ मे पर्यंत वाढवण्यात आली .
जामीन फेटाळताना हायकोर्टाने सिसोदिया यांच्याबद्दल काही गोष्टींचा उल्लेख केला ज्यामध्ये सर्वात महत्वाची बाब होती केसच्या कामकाजाबद्दलची. दिल्ली हायकोर्टाने मान्य केलं की, आम आदमी पक्षाच्या नेत्याविरोधात खटला दाखल करण्यात फिर्यादीला यश मिळालं, मात्र जामीनासाठी आधार तयार करण्यात याचिकाकर्ते मनीष सिसोदिया अपयशी ठरले.
कोर्टाचे हे ऑब्जर्वेशन खूप महत्वाचे मानले जात आहे, यामधून मनीष सिसोदिया यांच्या प्रकरणात कामकाजात काही कमतरता राहत असल्याचे बोलले जात आहे.
कारण त्याच केसमध्ये मनीष सिसोदिया यांच्यानंतर अटक झालेल्या संजय सिंह हे जेलमधून सुटून बाहेर आले, इतकेच नाही तर अरविंद केजरीवाल देखील सुटले. त्यामुळे मनीष सिसोदिया यांच्या केसच्या कामकाजावर संशय व्यक्त केला जात आहे.
मनीष सिसोदिया यांना आजवर कोर्टाकडून एकच दिलासा मिळाला आहे. तो म्हणजे त्यांच्या आजारी पत्नीला भेटण्याची मुभा. पण ही देखील मानवीय आधारावर देण्यात येते.
दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणाशी संबंधीत मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मनीष सिसोदिया यांच्या प्रमाणेच केजरीवाल आणि संजय सिंह देखील आरोपी आहेत आणि त्यांना अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले होते. मात्र सध्या ते जामीनावर बाहेर आहेत. मात्र सिसोदिया यांना जामीन मिळण्यात आडचण येत आहे.
दिल्ली सरकारमध्ये अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री होते पण त्यांच्याकडे कोणताही पोर्टफोलिओ नव्हता, म्हणजे ते चीफ मिनीस्टर विदाउट पोर्टफोलियो राहिले आहेत आणि मनीष सिसोदिया १८ विभागांचे मंत्री - दिल्ली हायकोर्टाने ही बाब खूप गंभीरतेने घेतली आहे. हायकोर्टाचे म्हणणे आहे की इतके जास्त विभाग सांभाळत असल्याने आणि आपचे वरिष्ठ नते असल्याने मनीष सिसोदिया यांचा सरकार आणि पक्षात प्रभाव आहे. ते सत्ताकारणात पावरफुल नेते आहेत.
दिल्ली हायकोर्टाचे म्हणणे आहे की, मनीष सिसोदिया प्रभावशाली व्यक्ती आहेत.... अनेक लोकांनी त्यांच्याविरोधात जबाब दिले आहेत.... त्यामुळे शक्यता आहे की जामीनावर बाहेर आल्यानंतर ते लोकांना जबाब बदलण्यास सांगू शकतात. पण बचाव पक्ष याला उत्तर देऊ शकला नाही, कारण सिसोदिया यांचा प्रभाव संजय सिंह यांच्यासारखाच आहे. पण अरविंद केजरीवाल या दोघांपेक्षा जास्त प्रभावशाली आहेत. तरीही सिसोदियांना जामीन नाकारण्यात आला आहे.
केजरीवाल यांना जामीन मिळाल्यावर केजरीवाल हे वकील अभिशेक मनु सिंघवी यांचे आभार मानण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते तसेच, सिंघवी आमच्यासाठी शक्तीचा स्त्रोत असल्याची पोस्टही त्यांनी केली होती. यामध्ये मनीष सिसोदिया यांच्यासाठी अशी सोय नाहीत का? असा प्रश्न विचारला जातोय. तसेच सिसोदिया यांना मिळत असलेली कायदेशीर मदत पुरेशी नाही का? असा प्रश्नही विचारला जात आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री असल्याने मद्य घोटाळा प्रकरणात जे काही झालं ते अरविंद केजरीवाल यांच्या आदेशांशिवाय होणे शक्य नाही असे बोलले जात आहे. तसंच आम आदमी पक्षाला देखील या प्रकरणात आरोपी बनवण्यात आले आहे, त्यामुळे मनीष सिसोदिया यांच्यावर असलेले आरोप केजरीवाल यांच्यापेक्षा गंभीर असू शकत नाहीत असे म्हटले जात आहे. त्यामुळे सिसोदियांना जामीन नेमका का मिळू शकत नाहीये हा प्रश्न विचारला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.