PM Narendra Modi : कोण आहे तो भाजप नेता?, ज्यांची आठवण करून PM मोदींच्या डोळ्यात तरळले अश्रू...

PM Narendra Modi : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी मैदानात उतरले आहेत. तामिळनाडू येथील सभेत नरेंद्र मोदी भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
PM Narendra Modi
PM Narendra Modiesakal
Updated on

PM Narendra Modi :   आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी मैदानात उतरले आहेत.  तामिळनाडू येथील सभेत नरेंद्र मोदी भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. तामिळनाडूत १० वर्षापूर्वी भाजप कार्यकर्त्याची हत्या झाली होती. या घटनेची मोदींनी आठवण काढली.

तामिळनाडूतील सेलम येथे मंगळवारी एका सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी खूपच भावूक झाले. भाजपचे प्रदेश सरचिटणीस 'ऑडिटर' व्ही रमेश यांची आठवण करून भावूक होऊन त्यांनी भाषण थांबवले.

आपल्या नेत्याचे स्मरण करून मोदी म्हणाले की, आज मी सालेममध्ये आहे. मी ऑडिटर रमेश यांना मिस करत आहे. आज सालेमचा तो रमेश आपल्यात नाही. रमेश यांनी पक्षासाठी अहोरात्र मेहनत घेतली. ते आमच्या पक्षाचे समर्पित नेते होते. ते एक उत्तम वक्ता आणि खूप मेहनती व्यक्ती होते. मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो.

मोदींनी तामिळनाडू भाजपचे माजी अध्यक्ष केएन लक्ष्मणन यांचेही स्मरण केले आणि आणीबाणीविरोधी आंदोलनातील त्यांची भूमिका अविस्मरणीय असल्याचे सांगितले.

PM Narendra Modi
Sharad Pawar: सुप्रीम कोर्टाचा शरद पवार गटाला दिलासा! तर अजित पवार अन् निवडणूक आयोगाला दिले 'हे' निर्देश

आणीबाणीविरोधी चळवळीतील लक्ष्मणन यांची भूमिका आणि सामाजिक-सांस्कृतिक कार्यात सहभाग कायम स्मरणात राहील, असे पंतप्रधान म्हणाले. राज्यात भाजपच्या विस्तारात त्यांचे योगदान अविस्मरणीय आहे. राज्यात अनेक शाळाही सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. (Latest Marathi News)

जुलै 2013 मध्ये सालेममध्येच ऑडिटर रमेश यांची हत्या झाली होती. 54 वर्षीय रमेश यांची मारवणेरी येथील घरात घुसून हत्या करण्यात आली होती. त्याआधी ‘हिंदू मुन्नानी’ संघटनेच्या वेल्लयप्पनची हत्या झाली होती. ऑडिटर रमेश 1978 पासून आरएसएसशी संबंधित होते. त्याच्या हत्येनंतर त्याच्या आईने न्यायासाठी लढा दिला. त्यांच्या मुलासह कार्यकर्त्यांना भाजप लक्ष्य करण्यात आल्याचे त्यांच्या आईने सांगितले होते.

PM Narendra Modi
Prakash Ambedkar: मविआत जागा वाटपावरून गोंधळ! प्रकाश आंबेडकरांची थेट काँग्रेसला ऑफर...वंचितची नेमकी भूमिका काय?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.