PM Modi : सोशल मीडियावर काँग्रेसचा हल्लाबोल, पंतप्रधान मोदींना केलं जातंय टार्गेट?

महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरून भाजपवर हल्लाबोल करणाऱ्या काँग्रेसने आता थेट पंतप्रधान मोदींवरच हल्लाबोल करायला सुरुवात केली आहे
PM Modi
PM Modiesakal
Updated on

Why Congress Targeting PM Modi : गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल करत आहे. काँग्रेस सोशल मीडियावर आक्रमक असून अनेक मुद्द्यांवरून पंतप्रधानांना घेरलंआहे. कधी मणिपूर हिंसाचार तर कधी नेहरू संग्रहालय स्मारकाचे नाव बदलून पंतप्रधान मोदींना थेट लक्ष्य करण्यात येतंय. काँग्रेसची रणनीती पाहिली तर एक गोष्ट स्पष्टपणे दिसून येते की, महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरून भाजपवर हल्लाबोल करणाऱ्या काँग्रेसने आता थेट पंतप्रधान मोदींवरच हल्लाबोल करायला सुरुवात केली आहे.

चीन, गलवान व्हॅली, अन्न भाग्य योजना आणि पंतप्रधान मोदींच्या मागील विधानांसह अनेक मुद्द्यांवर काँग्रेसने पंतप्रधानांना घेरल आहे. आता काँग्रेसने आपली रणनीती बदलल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. आता ती पक्ष किंवा केंद्र सरकारला प्रश्न करत नसून थेट पंतप्रधान मोदींवरच हल्लाबोल करत आहे. पक्षाला वाटतं की, पंतप्रधानांची प्रतिमा खराब करून कदाचित ते आपल्या हेतूमध्ये यशस्वी होऊ शकतात. जाणून घ्या, काँग्रेस कोणत्या मुद्द्यांवर पंतप्रधान मोदींना घेरतेय.

अन्न भाग्य योजना : तांदळाचा कोटा बंद झाल्यावर पंतप्रधानांना केले प्रश्न

कर्नाटक निवडणुकीदरम्यान काँग्रेसने अन्न भाग्य योजनेची घोषणा केली होती. या योजनेतून 1.28 कोटी दारिद्रय रेषेखालील लोकांना लाभ मिळणार होता. मात्र केंद्राने राज्य सरकारला गहू आणि तांदूळ विकण्याऐवजी तो खासगी व्यापाऱ्यांना विकण्याचे आदेश भारतीय अन्न महामंडळाला दिले. यावर काँग्रेसने केंद्राऐवजी पंतप्रधान मोदींना घेरले. राज्यात भाजपचा पराभव झाला म्हणून गरिबांचे धान्य बंद झाले, असे काँग्रेसचे म्हणणे आहे.

गलवन व्हॅली: शहीद जवानांच्या स्मरणार्थ पंतप्रधानांवर निशाणा

3 वर्षांपूर्वी 15-16 जून रोजी लडाखच्या गलवान खोऱ्यात LAC वर भारतीय लष्कराच्या कर्नलसह 20 जवान शहीद झाले होते. याबाबत भारताने दावा केला होता की, या घटनेत चीनचं नुकसान झालंय. मात्र, चीनने यावर कोणतेही वक्तव्य केले नाही आणि नुकसानही मान्य केलेलं नाही. यावर काँग्रेसचे म्हणणे आहे की, पीएम मोदींनी चीनला क्लीन चिट दिली, पण आताही तेथील परिस्थिती सामान्य झालेली नाही. (History)

मणिपूर हिंसाचार: पंतप्रधान बेपत्ता झाल्याची तक्रार

काँग्रेसने मणिपूर हिंसाचारातील मृत्यूंसाठी पंतप्रधान मोदींना जबाबदार धरत एका बातमीचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. ज्यामध्ये 500 बुद्धिजीवींनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून या हिंसाचाराची जबाबदारी घेण्यास सांगितले आहे.

मणिपूर हिंसाचार प्रकरणी काँग्रेसचं म्हणणे आहे की पंतप्रधान गप्प आहेत, ते बेपत्ता आहेत.

नेहरू मेमोरिअल म्युझियम: नाव बदलल्यावर हुकूमशाह हे लेबल

नुकतेच केंद्र सरकारने नेहरू मेमोरियलचे नाव बदलून पीएम मेमोरियल केलं आहे. यावर काँग्रेस अध्यक्षांनी ट्विट केलंय. ट्विटमध्ये म्हटले आहे की, ज्यांना स्वतःचा इतिहासच नाही ते इतरांचा इतिहास पुसायला निघाले आहेत. ही हुकूमशाही वृत्ती आहे.

बलात्कार करणाऱ्यांना संरक्षण दिल्याचा आरोप

काँग्रेसने नुकतेच एक ट्विट शेअर केले आहे. ट्विटमध्ये म्हटले आहे की, एकेकाळी पीएम मोदी मुलींसोबत फोटो काढायचे, आज ते त्यांच्या विरोधात आहेत. बलात्काऱ्यांना संरक्षण देण्याचे काम त्यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.