Tomato Price Rise: देशभरात टोमॅटोचे भाव गगनाला का भिडलेत? ग्राहक व्यवहार सचिवांनी सांगितलं कारण

देशभरात सध्या टोमॅटोचे भाव प्रचंड वाढले आहेत. त्यामुळं सर्वसामान्य नागरिकांचं कंबरडं मोडलं आहे.
tomato price reaches 100 rupees per kg in mumbai
tomato price reaches 100 rupees per kg in mumbai
Updated on

नवी दिल्ली : देशभरात सध्या टोमॅटोचे भाव प्रचंड वाढले आहेत. त्यामुळं सर्वसामान्य नागरिकांचं कंबरडं मोडलं आहे. सध्याच्या घडीला टोमॅटोचा भाव महाराष्ट्रासह देशभरात १०० ते १२० रुपये प्रतिकिलोवर गेला आहे. काही दिवसांपूर्वी टोमॅटोचे भाव पडलेले असताना अचानक त्यात मोठी वाढ झाल्यानं सर्वसामान्य ग्राहकाला मात्र फटका बसतोय. (Why prices of tomatoes rise across the country Consumer Affairs Secretary gives reason)

टोमॅटोचे भाव अचानक का वाढलेत?

टोमॅटोचे भाव अचानक का वाढलेत? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. या भाववाढीवर ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे सचिव रोहित कुमार सिंह यांनी सांगितलं की, "टोमॅटोच्या किंमतीत चढउतार सुरु असतात. कारण टोमॅटो लागवडीचा काळ हा संपूर्ण भारतातील विविध भागात वेगवेगळा आहे. त्यामुळं प्रत्येक वर्षी या काळात टोमॅटोचे भाव वाढलेले असतात. सध्या दिल्लीत टोमॅटोचे भाव वाढलेले आहेत. हिमाचल प्रदेशातील शिरमौर आणि सोलन येथून टोमॅटो दिल्लीच्या बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे, त्यामुळं आपोआप त्याचे भाव कमी होतील" (Latest Marathi News)

tomato price reaches 100 rupees per kg in mumbai
Pune Girl Student Attack: 'त्या' सुपरहिरोंचा शरद पवारांच्या हस्ते होणार 'बालगंधर्व'मध्ये जाहीर सत्कार

व्यापाऱ्यांचं म्हणणं काय?

दिल्लीची बाजारपेठ ही बहुतकरुन हिमाचलमधून येणाऱ्या टोमॅटोंवर अवलंबून आहे. पण हरयाणातच टोमॅटोचं उत्पादन घटलं असून यात ३० टक्क्यांनी घट झाली असल्यानं दिल्लीच्या मार्केटमध्ये याचे भाव गगनाला भिडलेत, असं दिल्लीतील व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. पावसामुळं हरयाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेशातील टोमॅटोच्या पिकाला फटका बसल्यानं उत्पादनात घट झाल्याचं सांगितलं जात आहे.

उत्तर भारतात टोमॅटोच्या पिकाला फटका बसल्यानं दक्षिण भारतातून इथं टोमॅटो मागवला जात आहे. यासाठी वाहतूक खर्च वाढल्यानं टोमॅटोचा किरकोळ विक्रीच्या भावात मोठी वाढ झाली आहे. तसेच गुजरात आणि मध्य प्रदेशात देखील सध्या बंगळुरु, नाशिक या भागातून टोमॅटो मागवला जात आहे. पण सध्या टोमॅटोचा तुटवडा असल्यानं अनेक ठिकाणी याची साठेबाजी आणि काळाबाजारही सुरु असल्याचं चित्र आहे. (Marathi Tajya Batmya)

tomato price reaches 100 rupees per kg in mumbai
Pankaja Munde : मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत फेटा बांधणार नाही; पंंकजा मुंडेंचं मराठा अस्त्र?

महाराष्ट्रात ६०-७० रुपये किलो भाव

महाराष्ट्रात टोमॅटोचा काही भागात तुटवडा तर काही भागात योग्य पुरवठा होत असल्यानं टोमॅटोच्या भावात दुप्पटीनं वाढ झाली असून सध्या ७० ते १०० रुपये किलोनं टोमॅटो मिळत आहेत. पावसामुळं आणि गारपीटीमुळं या पिकाला मोठा फटका बसला असल्यानं पुरवठा कमी झाल्याचं शेतकऱ्यांकडून सांगितलं जात आहे.

tomato price reaches 100 rupees per kg in mumbai
Uddhav Thackeray : समान नागरी कायद्याला ठाकरे गट पाठिंबा देणार? वरिष्ठ नेत्यांशी करणार चर्चा अन्...

भारतात टोमॅटोचा सिझन कसा असतो?

भारतात महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश आणि हरयाणात टोमॅटोचं सर्वाधिक उत्पादन होतं. यामध्ये ऑगस्ट ते सप्टेंबरमध्ये टोमॅटोची लागवड होते. तसेच फेब्रुवारी ते जुलैदरम्यान दुसऱ्या पिकाची लागवड होते. याचे टोमॅटो जून-जुलैमध्ये तयार होतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.