Tiranga: RSSने 52 वर्षे का नाही फडकवला तिरंगा? संघ समर्थक देतात हे कारण

तब्बल 52 वर्षे देशातील सर्वात मोठी संघटना RSSने आपल्या मुख्यालयात आणि कार्यलयात तिरंगा का फडकवला नाही?
Tiranga
Tirangasakal
Updated on

तिरंगा हा भारताचा आण बाण आणि शान आहे.. प्रत्येक भारतीय गर्वाने आपल्या देशाचा झेंडा फडकवतात. भारताच्या तिरंग्याचे अनेक रुप बदलले गेले. इतिहासात तर तिरंगावरुन अनेक प्रश्नही निर्माण करण्यात आले. यातलात एक प्रश्न म्हणजे तब्बल 52 वर्षे देशातील सर्वात मोठी संघटना RSSने आपल्या मुख्यालयात आणि कार्यलयात तिरंगा का फडकवला नाही?

1950 मध्ये असे काय झाले की ज्यामुळे RSS ने 2002 पर्यंत ‘तिरंगा’ फडकवला नाही? काय होता ‘नेशनल फ्लॅग कोड’ ज्यामुळे RSSसाठी तिरंगा फडकवणे गुन्हेगारी श्रेणीत आले.. चला तर जाणून घेऊया.

Tiranga
National Flag: ५ झेंड्यांनंतर सध्याचा तिरंगा राष्ट्रध्वज म्हणून झाला फायनल

स्वातंत्र्यानंतर संघाची ताकद सातत्याने वाढत होती. संघाने राष्ट्रीय सण 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी धुमधुडाक्यात साजरी करत होते. लोक पण त्यांच्या सोबत सहभागी होत होते पण संघाची लोकप्रियता थांबविण्यासाठी राष्ट्रीय तिरंगा नियम म्हणजेच 'नॅशनल फ्लॅग कोड' आणण्यात आला, असं म्हटले जाते.

National Flag Code हा 1950 मध्ये लागू करण्यात आला. या द्वारे वैयक्तिक स्थळी तिरंगा फडकवण्यास मनाई केली गेली. तिरंगा फक्त सरकारी इमारती किंवा कार्यलायात आणि काही खास लोकांकडूनच फडकवला जाऊ शकत होता. जर कोणी या नियमाचे उल्लंघन केले तर त्याच्यावर कारवाई केली जायची त्यामुळे कायद्यानुसार तिरंगा संघाच्या कोणत्याच शाखेत फडकवल्या जाऊ शकत नव्हता कारण ती प्राइवेट जागा होती. स्वातंत्र्यानंतर तिरंगा फडकवण्याचं स्वातंत्र्य मात्र नव्हतं.

Tiranga
National Flag: 'हर घर तिरंगा'च्या प्रचारासाठी खासदार काढणार बाईक रॅली

यानंतर कांग्रेसचे Member of Parliament नवीन जिंदल यांनी आपल्या फैक्ट्री ‘जिंदल विजयनगर स्टील्स’ मध्ये तिरंगा फडकवणे सुरू केले त्यानंतर बराच वाद पेटला. अखेर जिंदल यांना स्वत:च्याच देशाचा तिरंगा फडकवण्यासाठी कोर्टात धाव घ्यावी लागली.

1994 पासून सुरू झालेल्या संघर्षाला 2002 मध्ये यश मिळालं. 2002 मध्ये सुप्रीम कोर्टाने नॅशनल फ्लॅग कोडमध्ये प्रायवेट क्षेत्रालासुद्धा तिरंगा फडकवण्याचे स्वातंत्र्य दिले. त्यानंतर संघाच्या वेगवेगळ्या कार्यालयात तिरंगा फडकवण्यास सुरुवात झाली असा दावा संघाच्या समर्थकांकडून केला जातो.

संघ समर्थकांकडून नॅशनल फ्लॅग कोडचे कारण दिले जात असले तरी विरोधक मात्र यावरून देखील टीका करतात. altन्यूज या वेब साईट ने केलेल्या फॅक्ट चेक नुसार नॅशनल फ्लॅग कोडमध्ये खाजगी संस्थांना राष्ट्रध्वज फडकवण्याची परवानगी नव्हती मात्र स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन आणि गांधी जयंती या तीन राष्ट्रीय सणांच्या वेळी मात्र तिरंगा फडकवला जाऊ शकत होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मात्र या तीन दिवशी देखील कधी तिरंगा फडकवला नाही. यातून त्यांचा हेतु व वर दिलेले कारण योग्य नाही असा आरोप संघाच्या विरोधकांकडून केला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.