का पाडला जातोय सुपरटेक ट्विन टॉवर? घ्या जाणून

आज नोएडातील अनधिकृतपणे बांधण्यात आलेले ट्विन टॉवर पाडले जाणार आहेत.
why twin tower noida demolition noida
why twin tower noida demolition noida esakal
Updated on

आज नोएडातील अनधिकृतपणे बांधण्यात आलेले ट्विन टॉवर पाडले जाणार आहेत. एडिफाय इंजिनीअरिंगला हे ट्विन टॉवर्स पाडण्याचे काम देण्यात आले आहे. हे ट्विन टॉवर पाडण्यासाठी 46 जणांची टीम काम करत आहे. ही टीम दररोज सुमारे 12 तास स्फोटकं लावण्याचं काम करत आहे. स्फोटकांच्या मदतीनं अवघ्या तीन मिनिटांत एपेक्स आणि सायन नावाचे हे दोन टॉवर जमीनदोस्त होतील. जमीनदोस्त होणारी देशातील ही पहिली उंच इमारत असेल.(why twin tower noida demolition noida)

नोएडातील सेक्टर 93 मध्ये सुपरटेक बिल्डर्स या खासगी बांधकाम व्यवसायिकाने दोन 32 मजली इमारती बांधल्या आहेत. अॅपेक्स आणि सेयान असं या इमारतींचं नाव आहे. मात्र इमारती बांधताना भुखंडाच्या तसेच बांधकामाच्या नियमांना पायदळी तुडवण्यात आल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यामुळेच या इमारती पाडण्याचा आदेश काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने दिला आहे. त्यानुसार बुधवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास अत्युच्च तंत्रज्ञानाचा वापर करत या इमारती जमीनदोस्त केल्या जाणार आहेत.

एवढं मोठं बजेट वापरून आणि मेहनतीने बांधण्यात आलेल्या टोलेगंज इमारती पाडण्याची ही पहिलीच वेळ आहे. दिल्लीतील अतिशय दाटीवाटीच्या वसतीत उभ्या या दोन इमारतींजवळच 12 मजली इमारत आहे. विशेष म्हणजे अॅपक्स आणि सेयान या दोघींमध्ये तर फक्त9 मीटर अंतर आहे. या इमारती जमीनदोस्त करण्याच्या प्रक्रियेसाठी येथील नागरिकांना पाच तास इतरत्र स्थलांतरीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच पाळीव प्राण्यांनाही या परिसरात ठेवू नये असे सांगण्यात आलं आहे.

खरेदीदारांचा आरोप काय?

खरेदीदारांचा आरोप आहे की, हे टॉवर बनवताना नियम डावलण्यात आले आहेत. सोसायटीतील रहिवासी यूबीएस तेवतिया सांगतात की, टॉवरची उंची जसजशी वाढत जातं, तसतशी दोन टॉवरमधील अंतर वाढत जातं. अग्निशमन अधिकाऱ्यांनी स्वत: सांगितलं की, एमराल्ड कोर्ट ते एपेक्स किंवा सिएना हे किमान अंतर 16 मीटर असावं. पण एमराल्ड कोर्टच्या टॉवरपासून त्याचं अंतर फक्त 9 मीटर होतं. या नियमाचं उल्लंघन केल्याबद्दल नोएडा प्राधिकरणाकडून अग्निशमन अधिकाऱ्यांना कोणतंही उत्तर देण्यात आलं नाही. उंच टॉवरच्या उंचीवर वारा, सूर्यप्रकाश थांबतो, त्यामुळे दोन टॉवर्समध्ये 16 मीटर अंतर असावं, असा नियम आहे.

दोन टॉवर्समधील अंतर कमी असल्यानं आग पसरण्याचा धोका वाढतो. खरेदीदारांचा आरोप आहे की, टॉवर्सच्या नव्या नकाशात या गोष्टींची दखल घेण्यात आली नव्हती.

‘सुपरटेक’ कंपनीला न्यू ओखला औद्योगिक प्राधिकरणाने ९ मजल्यांचे १४ टॉवर्स बांधण्याची परवानगी २००५ मध्ये दिली होती. यामध्ये शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि बागेचा देखील समावेश होता. त्यानंतर २००९ मध्ये या प्रकल्पात सुधारणा करत ‘एपेक्स’ आणि ‘सेयान’ हे दोन भव्य टॉवर्स बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठीच्या नवीन आराखड्याला नोएडा प्राधिकरणाकडून परवानगी देण्यात आली होती.

अनधिकृत बांधकामाचा आरोप करत या प्रकल्पाविरोधात ‘द इमेरॉल्ड कोर्ट ओनर्स रेसिडेन्ट्स वेलफेअर’ने(RWA) २०१२ मध्ये उच्च न्यायालयात धाव घेतली होती. बांधकाम अनधिकृत ठरवून २०१४ रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाने हे टॉवर्स पाडण्याचे आदेश दिले होते. या निकालाविरोधात ‘सुपरटेक’ कंपनी आणि नोएडा प्राधिकरणाने सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावलं होतं. मात्र, सर्वोच्च न्यायालयानं अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत हे टॉवर्स पाडण्याचे आदेश दिले होते. इमारतीचे नियम आणि अग्निसुरक्षा धाब्यावर बसवून हे टॉवर्स बांधण्यात आल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()