दुसऱ्या लाटेत तरुणांना कोरोना का झाला? ICMRनं सांगितलं कारण

कोरोना
कोरोना
Updated on

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं (Corona Second Wave) देशात हाहाकार माजवलाय. दररोज कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दुसऱ्या लाटेत तरुणांना कोरोनाचा संसर्ग होत आहे. दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव सर्वाधिक तरुणांना का होतोय? याचं कारण भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) सांगितलं आहे. कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर तरुणांनी मोठ्याप्रमाणात घराबाहेर पडण्यास सुरुवात केली असावी त्यामुळेच कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला असल्याचं निरिक्षण ICMR चे महासंचालक बलराम भार्गव (Dr Balram Bhargava) यांनी नोंदवलं आहे. (why young people getting more affected in Covid 2nd wave, explains ICMR chief)

दुसऱ्या लाटेत कोरोनाचा संसर्ग तरुणात का होतोय? या प्रश्नाचं उत्तर देताना बलराम भार्गव (Balram Bhargava) म्हणाले की, ''पहिल्या आणि दुसऱ्या कोरोना लाटेतील डेटा तपासून पाहिला असता त्यामध्ये जास्त काही फरक जाणवत नाही. प्रतिकूल परिणामासाठी 40 वर्षापेक्षा अधिक वयाचे लोक जास्त असुरक्षित असतात. तरुणांमध्ये कोरोनाचा संसर्ग आधिक प्रमाणात होण्याचं प्रमाण थोडं वाढल्याचं दिसत आहे कारण त्यांवी अचानक घराबाहेर पडण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय देशात कोरोनाचा नवा व्हेरियंट आढळून आला असून त्याचाही परिणाम झालेला असू शकतो''

कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेनं भारतात हाहाकार माजवलाय. आरोग्य व्यवस्था खोळंबली आहे. कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, ओडिशा, पश्चिम बंगाल, पंजाब, केरळ या 16 राज्यांमध्ये कोरोनाचा प्रभाव वाढत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.