बंगळुरू - आपल्या पतीच्या त्वचेचा रंग काळा असल्याने त्याचा अपमान करणे म्हणजे क्रौर्य आहे. तसेच घटस्फोट देण्यासाठी हे सबळ कारण असल्याचं असे मत कर्नाटक उच्च न्यायालयाने व्यक्त केलं. नुकत्याच एका ४४ वर्षीय व्यक्तीला घटस्फोट देण्याच्या निर्णयात न्यायालयाने हे मत व्यक्त केले आहे.
उपलब्ध पुराव्यांची बारकाईने तपासणी केल्यावर पत्नीने काळ्या रंगामुळे पतीचा अपमान केला होता. त्यामुळेच तिने पतीला सोडले होते, असा निष्कर्ष काढण्यात आल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. हिंदू विवाह कायद्याच्या कलम १३ (१) (अ) अन्वये घटस्फोटाची याचिका मंजूर करताना उच्च न्यायालयाने म्हटले की, ही बाब लपविण्यासाठी तिने (पत्नीने) पतीवर अनैतिक संबंधांचे खोटे आरोप केले. ही वस्तुस्थिती निश्चितच क्रौर्यासारखी आहे.
बेंगळुरूच्या या जोडप्याचे २००७ मध्ये लग्न झाले होते. त्यांना एक मुलगी आहे. पतीने २०१२ मध्ये बंगळुरूच्या कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला होता. या महिलेने पती आणि सासरच्या लोकांविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ४९८ अ (विवाहित महिलेवर अत्याचार) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. तसेच तिने कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. तसेच मुलाला सोडून आई-वडिलांसोबत राहत होती.
कौटुंबिक न्यायालयाने २०१७ मध्ये पतीची घटस्फोटाची याचिका फेटाळून लावली होती, त्यानंतर त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती अनंत रामनाथ हेगडे यांच्या खंडपीठाने म्हटले की, "पती चे म्हणणे आहे की त्याच्या काळ्या रंगामुळे पत्नी त्याचा अपमान करत असे. मुलासाठी हा अपमान सहन केला, असेही पतीने म्हटले आहे. त्यावर उच्च न्यायालयाने पतीला 'काळे' म्हणणे म्हणजे क्रौर्य असल्याचे म्हटले आहे.
पत्नीने पतीकडे परतण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही आणि रेकॉर्डवर उपलब्ध पुराव्यांवरून पती काळ्या रंगाचा असल्याने तिला लग्नात रस नसल्याचे सिद्ध होते. या युक्तिवादाच्या अनुषंगाने कौटुंबिक न्यायालयाने विवाह मोडण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.