High Court: पत्नीने पतीपासून वेगळे होण्याची मागणी म्हणजे नेहमीच क्रूरता नसते; उच्च न्यायालयाचे निरीक्षण

Calcutta High Court
Calcutta High Court
Updated on

Calcutta High Court: पतीपासून वेगळे राहण्याची पत्नीची मागणी ही नेहमीच वैवाहिक संबंध तोडणाऱ्या क्रूरतेसारखी नसते, असे कोलकाता उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. एक प्रकरणात निर्णय देताना न्यायमूर्ती हरीश टंडन आणि न्यायमूर्ती प्रसेनजीत बिस्वास यांच्या खंडपीठाने हे निरिक्षण नोंदवले.

पतीपासून वेगळे राहण्याची पत्नीची मागणी ही नेहमीच वैवाहिक संबंध तोडणाऱ्या क्रूरतेसारखी नसते, असे कोलकाता उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. एक प्रकरणात निर्णय देताना न्यायमूर्ती हरीश टंडन आणि न्यायमूर्ती प्रसेनजीत बिस्वास यांच्या खंडपीठाने हे निरिक्षण नोंदवले.

वेगळे राहण्याची परिस्थिती निर्माण झाली तर पती-पत्नी दोघांच्याही भावना आणि परिस्थिती समजून घेणे गरजेचे असते. वेगळे राहण्याची मागणी म्हणजे वैवाहिक बंधन तुटण्यास आमंत्रण देणाऱ्या क्रुरतेचे प्रमाण म्हणता येणार नाही. अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. याला चुकीचं देखील म्हणता येणार नाही. म्हणूनच, सध्याच्या परिस्थितीत भावना समजून घेण्यासाठी दोन्ही व्यक्तींवर परस्पर दायित्व लादले आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

वैवाहिक नातेसंबंध पती-पत्नीने एकमेकांवर दाखवलेल्या विश्वासावर अवलंबून असतात. पत्नीमधील प्रत्येक संघर्ष क्रौर्याच्या श्रेणीत येऊ शकत नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

"वेगवेगळ्या वातावरणात वाढलेल्या दोन व्यक्तींचे विचार कधीकधी परस्परविरोधी असू शकतात, परंतु त्यांना नेहमीच जीवनातील अनिश्चितता तसेच वैवाहिक नातेसंबंधातील सामान्य झीज लक्षात घेऊन वागले पाहिजे. प्रत्येकच संघर्ष क्रौर्य सारखा नसतो. यातील न्याय उच्च दर्जाच्या पुराव्याच्या आधारे केला जातो," असे न्यायालयाने 18 ऑक्टोबरच्या निकालात म्हटले.

Calcutta High Court
'हत्या सुनियोजित कटातूनच'! मोमीनपुऱ्यात जमीलची गोळ्या झाडून केली होती हत्या, १२ ते १४ जणांचा समावेश असण्याची शक्यता

एक प्रकरणात न्यायालयाने पतीची घटस्फोटाची याचिका फेटाळली. पतीने पत्नी नेहमी वेगळे राहण्याची मागणी करते. पत्नी अनेकदा त्याच्याशी भांडत होती, वेगळे राहण्याची मागणी करत होती आणि त्याच्यासाठी स्वयंपाक करत नाही, असा दावा करत न्यायालयात धाम घेतली.  त्याने पुढे असा आरोप केला की पत्नीने त्याच्या आर्थिक गोष्टींवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला आणि अखेरीस 2013 मध्ये वैवाहिक घर सोडून त्याला सोडले.

पत्नीने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तिने सांगितले की ती तिच्या आईवडिलांच्या घरी अभ्यासासाठी गेली होती. तिने सांगितले की नंतर तिला झारखंडमध्ये तिच्या सासरच्या घरी राहण्यास सांगितले गेले, तर तिचा नवरा कोलकाता येथे राहिला. तरी देखील पत्नीने पतीच्या इच्छेचा आदर केल्याचे न्यायालयाला सांगण्यात आले.

तिच्या पतीचे एका सहकाऱ्यासोबत विवाहबाह्य संबंध होते आणि तो कोलकात्यात या महिलेसोबत राहत होता, असा आरोप पत्नीने केला. असे असतानाही पत्नी त्याच्यासोबत राहण्यास तयार असल्याचे न्यायालयाला सांगण्यात आले. पत्नीवरील आरोप सिद्ध करण्यात पती अपयशी ठरल्याचे खंडपीठाच्या निदर्शनास आले. (Latest Marathi News)

पुढे, न्यायालयाने या दाव्याची दखल घेतली की पत्नीला आधी सासरच्या घरात जाण्यापासून रोखले गेले होते आणि स्थानिक लोकांच्या हस्तक्षेपानंतरच तिला आत प्रवेश दिला गेला. मात्र पती तेच घर सोडून सहकाऱ्यासोबत राहू लागल्याचे सांगितले जात आहे. उलटतपासणीदरम्यान पतीने या महिला सहकाऱ्याचे नाव किंवा संपर्क तपशील उघड करण्यास नकार दिल्याने उच्च न्यायालयाने त्याच्याविरुद्ध प्रतिकूल निष्कर्ष काढला. त्यामुळे पतीचे एका महिलेशी प्रेमसंबंध असल्याचा पत्नीचा आरोप सिद्ध झालेला नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.

Calcutta High Court
US Shooting : लेविस्टनमध्ये 22 जणांची हत्या करणाऱ्या संशयिताचा मृतदेह सापडला, पोलिसांना वेगळाच संशय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.