पत्नी प्रेग्नेंट होत नव्हती, टेस्ट केली अन् पायाखालची जमीनच सरकली, FIR दाखल करण्याची वेळ

Husband file FIR against Wife: पतीने आरोप केलाय की पत्नीने त्याची फसवणूक केली आहे. पतीने घटस्फोटाची मागणी केली आहे. याशिवाय पतीने पत्नी आणि सासरच्यांविरोधात एफआयआर देखील दाखल केला आहे.
 pregnant women
pregnant women
Updated on

गांधीनगर- गुजरातच्या अहमदाबादमध्ये एक विचित्र प्रकार समोर आला आहे. एका पतीने आपल्याच पत्नीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पतीने आरोप केलाय की पत्नीने त्याची फसवणूक केली आहे. पतीने घटस्फोटाची मागणी केली आहे. याशिवाय पतीने पत्नी आणि सासरच्यांविरोधात एफआयआर देखील दाखल केला आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

सरखेजमधील एका तरुणाचे २०२३ मध्ये पालनपूर गावातील एका तरुणीशी लग्न जमले. तरुणीचे वय ३२ होते आणि तरुणाचे वय ३४ होते. त्यामुळे दोघांचे लग्न ठरले होते. १९ जून २०२३ मध्ये दोघांचे थाटामाटात लग्न झाले. त्यानंतर दोघांनी मुलांना जन्म देण्याची प्लॅनिंग सुरु केली. पण, प्रयत्न करूनही पत्नी गरोदर होत नव्हती.

 pregnant women
Thane News: रिक्षा चालकाशी वाद जीवावर बेतला; शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाची हत्या

पतीने पत्नीला अनेक डॉक्टरांना दाखवले. औषधं सुरु करण्यात आली. पण, काहीही परिणाम झाला नाही. त्यानंतर पतीने सोनोग्राफी करण्याचा निर्णय घेतला. सप्टेंबर २०२३ मध्ये पत्नीला सोबत नेऊन त्याने स्त्री रोग तज्त्रांचे हॉस्पिटल गाठले. याठिकाणी डॉक्टरने जी माहिती सांगितली ती ऐकून पतीच्या पायाखालची जमीनच सरकली.

FIR दाखल करण्याची वेळ

डॉक्टरने खुलासा केला की, 'महिलेच्या मुलं होण्याच्या पिशवीमध्ये काही अडचणी असल्याने तिची गर्भधारण होऊ शकत नाही. महिलेचे वय ४० ते ४२ च्या दरम्यान आहे. त्यामुळे या वयात गर्भधारण होणे अवघड आहे. ' डॉक्टरकडून ही माहिती मिळाल्यानंतर पतीला धक्काच बसला. कारण, त्याला लग्न करताना महिलेचे वय ३२ असल्याचं सांगण्यात आलं होतं.

 pregnant women
Navi Mumbai: ज्वेलर्सचं दुकान लुटलं अन् हिरो असल्यासारखं निघून गेले; फिल्मी स्टाईल दरोडा CCTV मध्ये कैद

पतीने पत्नीला याबाबत विचारणा केली. तिने सुरुवातील याबाबत उडवाउडवीची उत्तरं दिली पण नंतर तिने कबुली दिली. सासरच्यांनी देखील त्याला खोटं सांगून लग्न लावलं होतं. महिलेचा जन्म १८ मे १९८५ चा आहे, तिने तो बदलून १८ मे १९९१ केला होता. यासंदर्भातील खोटे कागदपत्र पतीला दाखवण्यात आले होते. फसवणूक झाल्याने पतीने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. त्याने पत्नीपासून घटस्फोटाची तयारी सुरु केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.