वन्य प्राणी भरकटतात आणि मानवी वस्तीच्या भागात प्रवेश करतात. यामुळे त्यांना खूप मोठी किंमत मोजावी लागते, काही वेळा त्यांचा जीवही जातो. आजच कल्याण मध्ये बिबट्याने घातलेला धुमाकूळ, गेल्यावर्षी पुण्यात आलेल्या गव्याचा मृत्य, अवनी वाघिणीला घातलेली गोळी. या घटनांमध्ये आपण या प्राण्यांना कसं सांभाळायला हवे याची कायदेशीर आणि भावनिक बाजू समजून घेऊ. (wild animals found in human society read about Wildlife Protection Act )
कायदेशीर बाबी
1. वन्यजीव संरक्षण कायदा, 1972 वन्य प्राण्यांना जगण्याचा आणि स्वातंत्र्याचा अधिकार प्रदान करतो, परंतु तरतुदींची अंमलबजावणी फारशी होत नाही. या कायद्यानुसार, वन्य प्राणी मानवी जीवनास धोका निर्माण झाल्यास किंवा ते बरे होण्याच्या पलीकडे असतील तरच पकडले जाऊ शकतात किंवा मारले जाऊ शकतात परंतु केवळ भीतीपोटी नाही, भीतीपोटी त्यांना मारलं एका मानवी हत्ये इतकाच घृणास्पद आहे.
2. एखादा वन्य प्राणी मानवाच्या जीवाला धोका निर्माण झाला असला तरी, त्याला केवळ सक्षम अधिकाऱ्याच्या परवानगीनेच मारले जाऊ शकते, अर्थात राज्याचे मुख्य वन्यजीव वॉर्डन वर ही जबाबदारी असते. 2018 ला अवणी या नरभक्षक वाघिणीला याच कारणाने मारलं होतं.
3. संरक्षित क्षेत्र हे वन्य प्राण्यांसाठी आहेत, पण म्हणून मानवी वस्ती त्यांच्यासाठी निषिद्ध प्रदेश नाही. या मुक्या जीवांना समजतं तरी काय शिकारीच्या शोधत ते आपल्या वस्त्यांत येतात. तसेच कायदा त्यांच्या मुक्त हालचालीवर कोणतेही बंधन नाही.
नैतिक/भावनिक मुद्दा
1. जगण्याचा अधिकार हा आपल्या संविधानातील अधिकार फक्त माणसाला नाही तर प्रत्येक सजीवाला मिळायला हवा, परंतु दुर्दैवाने एखाद्या वन्य प्राण्याला, मुख्यतः बिबट्याला मारणे माणसाला तितके सोपे वाटते. वन्य प्राणी हे मानवी जीवनापेक्षा वेगळे नाहीत हे अजूनही आपल्या लक्षात कसं येत नाही.
2. माणसाच्या वस्तीत वन्य प्राण्यांच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा संरक्षित क्षेत्रात पाठवणे हा एकमेव पर्याय आहे.पण हा प्लॅन नेहमीच सक्सेसफुल होत नाही. या दरम्यानच बिथरलेला प्राणी लोकांचा जीव घेऊ शकतो
कल्याण पूर्वेतील चिंचपाडा परिसरात चक्क बिबट्या शिरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गुरुवारी सकाळी चिंचपाडा रोडवरील श्रीराम अनुग्रह टॉवर येथे हा बिबट्या सध्या शिरला होता.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.