रांची- झारखंडमधील राजकारण सध्या देशाच्या केंद्रस्थानी आलं आहे. माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चा पक्ष सोडण्याचे संकेत दिले आहेत. काल त्यांनी एक निवेदन जाहीर करून आपल्यासमोर तीन पर्याय असल्याचं जाहीर केले आहे. त्यामुळे ते कोणता मार्ग पत्करतात याबाबत उत्सुकता आहे.
चंपाई सोरेन यांनी म्हटलं की, 'मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा घेताना त्यांच्यासोबत अपमान झाला. आता त्यांच्यासमोर फक्त तीन पर्याय आहेत. एक, राजकारणातून निवृत्ती घेणे, दुसरा, स्वत:ची संघटना सुरु करणे आणि तिसरा दुसऱ्या एखाद्या संघटनेसोबत जाणे.' यातील तिसरा पर्याय ते अवलंबवण्याची दाट शक्यता आहे.