INDIA आघाडीकडून BJPच्या पराभवाची शक्यता नाही! सर्व्हे काय सांगतो पाहा?

केंद्रातील मोदी सरकारला हारवण्यासाठी प्रमुख २७ विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडी स्थापन केली आहे.
congress bjp india
congress bjp india
Updated on

नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारला हारवण्यासाठी प्रमुख २७ विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडी स्थापन केली आहे. पण ही आघाडी भाजपचा पराभव करु शकेल का? तसेच येत्या लोकसभा निवडणुकांनंतर मोदींना जनता पुन्हा पंतप्रधानपदी पाहू इच्छिते का? अशा अनेक प्रश्नांची उत्तर इंडिया टुडे आणि सीव्होटरनं केलेल्या 'मूड ऑफ नेशन्स' या सर्व्हेक्षणातून समोर आली आहेत. (Will INDIA alliance defeat BJP See what says India Today C Voter survey)

congress bjp india
WWC : ना तिरंगा, ना राष्ट्रगीत! ब्रिजभूषणमुळं जागतीक कुस्ती चॅम्पिअनशिपमध्ये भारताची नाचक्की

'इंडिया' आघाडी भाजपला हारवू शकते?

इंडिया टुडे- सी वोटरच्या सर्व्हेनुसार, विरोधकांची इंडिया आघाडी भाजपला हारवू शकत नाही. सर्व्हेला जितक्या लोकांनी प्रतिसाद दिला त्यांपैकी ५४ टक्के लोकांना असं वाटतं की, इंडिया आघाडी भाजपला हारवू शकत नाही. तर ३३ टक्के लोकांना वाटतं की, इंडिया आघाडी नक्कीच भाजपचा पराभव करेल. (Latest Marathi News)

congress bjp india
UP Minister News: उशीर होत असल्यानं मंत्र्यानं थेट रेल्वे प्लॅटफॉर्मवर चढवली कार; प्रवाशांमध्ये अफरातफरी

'इंडिया' या नावाचा किती फायदा होईल?

तसेच पूर्वीच्या युपीएचं नाव बदलून इंडिया ठेवल्यानं नावाच्या या बदलामुळं आघाडीला मत मिळू शकतील का? या प्रश्नावर ३९ टक्के लोकांना नक्कीच आघाडीला मत मिळतील असं वाटतंय. तर ३० टक्के लोकांना काहीही फरक पडणार नाही असं वाटतंय. तर उर्वरित १८ टक्के लोकांना असं वाटतं की इंडिया हे नाव मतदारांना आकर्षित करणार नाही कारण ते तितकं कॅची नाही.

congress bjp india
69th National Film Awards: 'कश्मीर फाईल्स'ची बाजी; दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीनं कोणाला केला पुरस्कार अर्पण? जाणून घ्या

'इंडिया'ला कोण लीड करु शकतो?

या प्रश्नावर २४ टक्के लोकांना वाटतं की राहुल गांधी इंडिया आघाडीचं नेतृत्व चांगल्या प्रकारे करु शकतात. तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना प्रत्येकी १५ टक्के लोकांनी दिली. याच प्रश्नावर जानेवारीत झालेल्या सर्व्हेमध्ये राहुल गांधी यांना केवळ १३ टक्के लोकांनी पसंती दिली होती. तर केजरीवाल यांच्या पारड्यात २७ टक्के लोकांनी पसंती टाकली होती. (Marathi Tajya Batmya)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.