दोन दिवसांपूर्वी लालूप्रसाद यादव यांचे आत्मचरित्र वाचले. कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी त्यांच्या आत्मचरित्राची प्रस्तावना लिहली आहे. भारताच्या राजकीय इतिहासात लालू प्रसाद यादव यांचा राजकीय प्रवास अनेक कारणांमुळे खूप खास आहे. नेते म्हणून त्यांनी बिहारमधील नवीन सामाजिक बदलांचे धागे विणले आणि मागासवर्गीय आणि अल्पसंख्यांकांना मुख्य प्रवाहात असलेल्या समाजासमोर उभे राहण्याचे धैर्य दिले. पण या राजकीय प्रवासात तेही जातीवादाच्या राजकारणात अडकले. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप करण्यात आले. या केलेल्या काही आरोपांमध्ये ते दोषी आढळले आणि आता त्यांना तुरूंगवासही भोगत आहेत.
'गोपाळगंज ते रायसिना: माझा राजकीय प्रवास' हे लालू यादव यांचे आत्मचरित्र खूप रंजक आहे. या पुस्तकात त्यांनी लहानपणापासून आत्तापर्यंतच्या प्रवासाचे तपशीलवार वर्णन केले आहे. यामध्ये बिहारचे मुख्यमंत्री आणि देशाचे रेल्वेमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामाच्या यश-अपयश यांचा उल्लेखही आहे.
पत्रकार नलिन वर्मा हे लालू यादव यांच्या या आत्मचरित्राचे सह-लेखक आहेत. या पुस्तकात त्यांच्याशी संबंधित बरेच रंजक किस्से देण्यात आल्या आहेत. यातील काही रंजक किस्से आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. यातील काही किस्से असे आहेत की त्यावर सहज विश्वास ठेवणे आपल्याला अवघड वाटते. यातील सर्वात महत्वाचा किस्सा म्हणजे लालकृष्ण अडवाणी यांना रथयात्रेदरम्यान केलेली अटक.
1990 मध्ये जेव्हा भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी रथयात्रेवर गेले तेव्हा बिहारमध्ये लालू यादव यांनी त्यांना अटक केली. याबाबत लालूंनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिले आहे की, 'नजरकैदेत असताना अडवाणींनी त्यांना खास विनंती केली की पत्नी कमला अडवाणी यांच्याशी आपल्याला बोलता यावे. मी माझ्या पत्नीशी बोललो नाही तर मला अस्वस्थ वाटते. माझ्यासमोर विचित्र आणि मोठा पेचप्रसंग उभा राहिला होता. अडवाणी हे काही गुन्हेगार नव्हते. त्यांनी मला ही एक फक्त विनंती केली होती.
परंतु दुसरी अशी एक गोष्ट मनात येत होती त्यांनी काही राजकीय गोष्टी आपल्या पत्नीला सांगितल्या तर. आणि ही गोष्ट लीक झाल्यास त्याचे दुष्परिणाम भयानक होऊ शकतात. अडवाणींचे समर्थक हे याच मुद्यांवर रस्त्यावर उतरले असते. माझ्या सहकाऱ्यांनी मला स्पष्टपणे सुचवले की मी अडवाणींची ही विनंती मान्य करू नये. पण भाजपच्या वरिष्ठ नेत्याच्या विनंतीवरून मी त्यांची ही विनंती मान्य केली. हॉटलाईनने लवकरच त्यांना त्यांच्या पत्नीशी बोलण्याची व्यवस्था केली होती. अडवाणी दिवसातून दोनदा त्यांच्याशी बोलत असत.
जेव्हा अडवाणी बोलत असत, त्यावेळी त्या खोलीत बिहारचे एक सरकारी अधिकारीदेखील होते. सुरुवातीला सरकारच्या या कृतीमुळे अडवाणी नाराज होते. यादरम्यान, अडवाणींच्या वागण्याचे कौतुक करताना लालू लिहितात, 'नजरकैदेत असताना अडवाणींनी आपल्या वागण्यात संतुलन व सौम्यता दर्शविली. कुठून तरी नजरकैदेत अडवाणी आपल्या पत्नीशी दिवसातून दोनदा बोलतात अशी फुटली.
कमला अडवाणी यांना एका ज्येष्ठ पत्रकाराने अडवाणी यांच्याशी बोलत असताना मुलाखत घेण्याची विनंती केली. ठरलेल्या दिवशी जेव्हा अडवाणी आपल्या पत्नीशी बोलत असताना तेव्हा पत्रकारांनी दुसर्या बाजूने अडवाणींशी बोलण्याचा प्रयत्न केला. अडवाणी यांनी त्यांच्याशी बोलण्यास नकार दिला. ते म्हणाले की त्यांनी मला फक्त पत्नीशी बोलण्याची परवानगी दिली आहे.
परंतु पत्रकाराने अडवाणींशी बोलणं झाल्याची बातमी प्रसारित केली. आता फक्त भाजपने केंद्र सरकारला दिलेला पाठिंबा मागे घेण्याची औपचारिकताच बाकी होती. या गोष्टीमुळे माझ्या सरकारबरोबर व्ही.पी.सिंग सरकारचीदेखील मोठ्या प्रमाणावर बदनामी झाली. दुमकाचे जिल्हाधिकारी यांना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली. अडवाणी यांना जेव्हा हे समजले तेव्हा ते फार दु: खी झाले आणि त्यांनी कोणत्याही पत्रकाराला कोणतीही मुलाखत दिली नसल्याचे स्पष्टपणे सांगितले. जर त्यांना हवे असते तर, ते गप्प राहून हे खोटे बोलू दिले असते, कारण ज्याने त्याच्या अटकेचा आदेश दिला त्या माणसाची ही बाब समस्या आणखीनच वाढू शकेल. पण सत्य सांगून त्यांनी आपल्या मनाचा मोठेपणा दाखवला असे लालूप्रसाद यादव यांनी आपल्या आत्मचरित्रात नमूद केले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.