नवी दिल्ली : भारतीय तरुणाच्या प्रेमाखातर भारतात दाखल झालेली सीमा हैदर ही पाकिस्तानी महिला सध्या ट्रेडिंगमध्ये आहे. ती लवकरच भारतीय राजकारणात दाखल होणार असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये झळकल्या.
या सीमा हैदरला केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी आपल्या पक्षात येण्याची ऑफर दिल्याचंही बोललं गेलं. पण या दाव्यात किती तथ्य आहे, हे खुद्द आठवले यांनीच स्पष्ट केलं आहे. (Will Seema Haider really enter RPI Ramdas Athawale clears his and Party stand)
आठवले म्हणाले, आमच्या पक्षाचा आणि सीमा हैदरचा काहीही संबंध नाही. ती पाकिस्तानातून भारतात दाखल झाली आहे. त्यामुळं तिला आमच्या पक्षात प्रवेश देण्याचा प्रश्नच येत नाही. जर आम्हाला तिला कुठलं तिकीट द्यायचंच असेल तर भारतातून पाकिस्तानात जाण्याचं तिकीट तिला देऊ. (Latest Marathi News)
आठवले पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते किशोर मासूम यांनी सीमा हैदरला आपल्या पक्षात सामील करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांनी सीमाची तुलना थेट काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्याशी केली होती. "इटलीहून आलेल्या सोनिया गांधी भारतात राजकारण करू शकतात, पंतप्रधानपदाच्या दावेदार होऊ शकतात तर पाकिस्तानची सीमा हैदर राजकारणात का येऊ शकत नाही?", असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता.
"सीमा हैदर खरोखर निर्दोष असतील, त्या गुप्तहेर असल्याचे कोणतेही पुरावे मिळाले नाहीत आणि त्यांना भारतीय नागरिकत्व देण्यात आलं तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या उत्तर प्रदेश महिला विंगच्या अध्यक्षपदी त्यांची निवड केली जाऊ शकते" असंही ते म्हणाले होते. सीमा हैदर एक उत्तम वक्त्या आहेत त्यांनी राजकारणात नशीब आजमवायला हवं" असंही किशोर मासूम म्हणाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.