Jack Dorsey: शेतकरी आंदोलनावेळी मोदी सरकारनं दिली होती धमकी; ट्विटरच्या माजी CEO चा खळबळजनक खुलासा

किसान आंदोलनावेळी सरकारकडून ट्विटर बंद करण्याची आणि छापेमारीची धमकी
Jack Dorsey
Jack DorseySakal
Updated on

Jack Dorsey: ट्विटरचे माजी सीईओ जॅक डॉर्सीने मोदी सरकारसंदर्भात खळबळजनक खुलासा केला आहे. किसान आंदोलनावेळी सरकारकडून ट्विटर बंद करण्याची आणि छापेमारीची धमकी देण्यात आली होती. असा दावा डॉर्सी यांनी केला आहे. Will Shut Twitter If Jack Dorsey Alleges Pressure During Farmers’ Protest

भारतात कृषी कायद्यांविरोधात झालेल्या किसान आंदोलनावेळी सरकारने अनेक ट्विटर अकाउंट ब्लॉक करण्याच्या सूचना दिल्या होत्या. यासाठी भारत सरकारने आपल्यावर दबाव आणला होता आणि भारतात ट्विटर बंद करण्याची धमकी दिली होती, असं डॉर्सी यांनी सांगितलं. त्यांच्या या दाव्यामुळे देशातील राजकारणाला नवं वळणं मिळणार आहे. पुन्हा एकदा विरोधक मोदी सरकारला घेरण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

जॅक डॉर्सीचा खळबळजनक दावा...

एका मुलाखतीदरम्यान जॅक डॉर्सीला आणण्याचा प्रयत्न कधी सरकारकडून झाला होता का? असा सवाल उपस्थित करण्यात आला. त्यानंतर असे अनेकवेळा घडल्याचे सांगितले. याबाबत त्यांनी भारताचे उदाहरण दिले.(Latest Marathi News)

Jack Dorsey
BJP : भाजपचं लोकसभा निवडणुकीत काय होणार? तामिळनाडू ते हरियाणातील सहकारी पक्षात नाराजी

'भारतात कृषी कायद्यांविरोधात झालेल्या किसान आंदोलनावेळी सरकारने अनेक ट्विटर अकाउंट ब्लॉक करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या सूचनांचे पालन न केल्यास सरकारने त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या घरांवर छापे टाकण्याची धमकी दिली होती. इतकंच नाही, नियम न पाळल्यास ट्विटरचे कार्यालय सुद्धा बंद करू अशी धमकी सुद्धा दिली होती'.(Latest Marathi News)

Jack Dorsey
Mukesh Ambani: दिल्ली NCRमध्ये अंबानींचा मोठा प्रकल्प, 8 हजार एकरमध्ये वसवणार जागतिक दर्जाचे शहर

मात्र, सरकारने दावा फेटाळला

डॉर्सीच्या दाव्यानंतर केंद्रीय मंत्र्याने ट्विट करत हा दावा फेटाळून लावला आहे. डॉर्सीच्या नेतृत्वाखाली ट्विटर आणि त्याची टीम सतत भारतीय नियमांचे उल्लंघन करत होती. 2020- 2022 दरम्यान अनेकवेळी त्यांनी नियम तोडले आहेत.

'डोर्सीच्या ट्विटरला भारतीय कायद्याचे सार्वभौमत्व स्वीकारण्यात अडचण येत होती', अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी दिली आहे.

देशात तीन कृषी कायद्याविरोधात आंदोलन

नोव्हेंबर 2020 मध्ये, भारत सरकारने देशात तीन कृषी कायदे लागू केले. मात्र, कायदा लागू होताच त्यांचा विरोधही सुरू झाला आणि वर्षभरापासून देशभर आंदोलने झाली. अखेर एका वर्षानंतर म्हणजेच नोव्हेंबर २०२१ मध्ये केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे मागे घेतले. आंदोलनादरम्यान सरकारला सोशल मीडियावर मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.