ज्युनिअर पैलवानाच्या हत्येप्रकरणी सुशील कुमारला पोलीस कोठडी

ज्युनिअर पैलवानाच्या हत्या प्रकरणी सुशील कुमारला रविवारी अटक करण्यात आली.
Sushil Kumar
Sushil Kumar fiel pohoto
Updated on

नवी दिल्ली : सागर राणा (Sagar Rana) या ज्युनिअर पैलवानच्या मृत्यूप्रकरणी अटकेत असलेला भारताचा ऑलिम्पिक पदक विजेता स्टार पैलवान सुशील कुमार (Sushil Kumar) आणि त्याचा सहकारी अजय कुमार यांना रविवारी स्थानिक कोर्टानं सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. दिल्ली पोलिसांनी कोर्टाकडे १२ दिवसांच्या पोलीस कोठडीची (Police custody) मागणी केली होती. (will Sushil Kumar get police custody court reserves order)

Sushil Kumar
राज्यात २४ तास लसीकरण मोहिम राबवण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत

कथीत हत्याप्रकरणी फरार असलेल्या सुशील कुमार आणि त्याचा सहकारी अजय कुमार यांना दिल्ली पोलिसांनी रविवारी सकाळी अटक केली. त्यानंतर त्याला रोहिणी सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी सुशील कुमारकडे २३ वर्षीय सागर राणा याच्या हत्याप्रकरणी चौकशी करण्यासाठी एसआयटीला कोर्टात ३० मिनिटांचा अवधी देण्यात आला होता. दरम्यान, सागर राणा याचे वडील अशोक राणा म्हणाले, "सुशील कुमार विरोधात माझ्या मुलाच्या हत्येविरोधातील ठोस पुरावे आहेत. त्यामुळे त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी"

Sushil Kumar
'कोरोनाचं भान ठेवा, फोटोशुट कसलं करताय, संवेदनशील व्हा'

सुशील कुमार हा भारताचा सर्वात यशस्वी पैलवान असून त्यानं भारताला दोन ऑलिंपिक पदकं, कॉमन वेल्थ गेम्समध्ये ३ सुवर्णपदकं, वर्ल्ड चॅम्पिअनशिपमध्ये १ सुवर्णपदक, एशिअन गेम्समध्ये १ कांस्य पदक आणि ४ एशिअन चॅम्पिअनशिप पदकं मिळवून दिली आहेत.

Sushil Kumar
एक जूननंतर निर्बंध शिथिल होणार?, टोपेंचं महत्वाचं विधान

३७ वर्षीय सुशील कुमारला सहकारी अजय कुमारसोबत रविवारी, २३ मे रोजी दिल्ली पोलिसांनी मुंडका भागातून ताब्यात घेतलं. हे दोघे कोणालातरी स्कुटरवरुन भेटायला जात असतानाच पोलिसांनी त्यांना अटक केली. दरम्यान, पोलिसांशी चौकशीदरम्यान सुशील कुमारनं हे मान्य केलं की ज्यावेळी भांडण झालं होतं तेव्हा तो तिथं हजर होता पण नंतर तो घरी झोपण्यासाठी निघून गेला.

Sushil Kumar
तौक्तेनंतर 'यास'चं संकट, मोदींनी बोलवली महत्वाची बैठक

या भांडणामध्ये जीव गमवावा लागलेला २३ वर्षीय ज्युनिअर पैलवान सागर राणा हा छत्रसाल स्टेडिअममध्ये कुस्तीचं प्रशिक्षण घेत होता. याच स्टेडिअममधील सुशील कुमार हा वरिष्ठ आणि प्रतिष्ठित पैलवान आहे. ४ मे रोजी येथे सुशील कुमार आणि इतर ४ पैलवानांनी सागर राणा आणि इतर ज्युनिअर पैलवानांना बेदम मारहाण केली होती. यामध्ये सागरचा मृत्यू झाला तर इतर दोघेजण गंभीर जखमी झाले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()