Taj Mahal : ताजमहाल की तेजो महालय? नाव बदलण्याच्या प्रस्तावावर आग्रा महापालिकेत चर्चा

हिंदुत्ववादी संघटनांकडून ताजमहालचं नाव बदलून तेजो महालय करण्याची चर्चा वेळोवेळी होत आहे.
Taj Mahal Agra
Taj Mahal Agraesakal
Updated on
Summary

हिंदुत्ववादी संघटनांकडून ताजमहालचं नाव बदलून तेजो महालय करण्याची चर्चा वेळोवेळी होत आहे.

आग्रा : प्रेमाची अमर निशाणी म्हटला जाणारा 'ताजमहाल' (Taj Mahal) सतत चर्चेत असतो. ताजमहालचं नाव बदलण्याचा विषय असो, ताजमहालमधील बंद खोलीचं रहस्य असो किंवा ताजमहालच्या आत भगवा परिधान करण्यावर बंदी असो. मात्र, आता ताजमहालशी संबंधित आणखी एक नवं प्रकरण जोडलं गेलंय.

भाजपचे (BJP) ताजगंज प्रभागातील नगरसेवक शोभाराम राठोड आज (बुधवार) महापालिकेच्या (Agra Municipal Corporation) बैठकीत ताजमहालचं नाव बदलून तेजो महालय करण्याच्या प्रस्तावावर चर्चा करणार आहेत. नाव बदलण्याचा प्रस्ताव यापूर्वीच सभागृहात मांडण्यात आला आहे. ताजमहाल आपल्या नावामुळं सतत चर्चेत असतं. हिंदुत्ववादी संघटनांकडून ताजमहालचं नाव बदलून तेजो महालय करण्याची चर्चा वेळोवेळी होत आहे.

Taj Mahal Agra
Som Prakash : 'कॉंग्रेस संपण्याच्या मार्गावर, प्रादेशिक पक्षही जास्त काळ टिकतील असं वाटत नाही'

याच दरम्यान आता भारतीय जनता पक्षाचे ताजगंज प्रभागातील नगरसेवक शोभाराम राठोड यांनीही ताजमहालचं नाव बदलण्यासाठी आवाज उठवला आहे. ताजमहालचं नाव बदलण्याबाबत त्यांच्याकडं अशी अनेक तथ्ये आहेत, ज्याच्या आधारावर त्यांनी सभागृहासमोर नाव बदलण्याचा प्रस्ताव ठेवल्याचं नगरसेवक राठोड यांचं म्हणणं आहे. आज बैठक होईल तेव्हा सर्व पुरावेही सभागृहात सादर करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

Taj Mahal Agra
Shahaji Patil : जयाभाऊ भावी मंत्री हुतंय हुतंय..; आमदार शहाजी पाटलांची जोरदार टोलेबाजी

महानगरपालिकेत ताजमहालचं नाव बदलण्याचा प्रस्ताव मांडणार : राठोड

आज दुपारी तीन वाजता आग्रा महानगरपालिकेत सदनाला सुरुवात होणार असून, त्यात शहरातील सर्व नगरसेवक सहभागी होणार आहेत. यावेळी नगरसेवक शोभाराम राठोड ताजमहालचं नाव बदलण्याचा प्रस्ताव मांडणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.