Petrol, Diesel Rates : पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त? सरकारचा 'टॅक्स'संदर्भात मोठा निर्णय

डिझेल, पेट्रोल, जेट इंधन यासह एटीएफच्या निर्यातीवर एसएईडी शून्यावर कायम ठेवण्यात आलेलं आहे. सीबीआयसी म्हणजेच सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेसने आपल्या एका आदेशात म्हटलं की, नवीन दर १६ मेपासून लागू करण्यात येतील.
Petrol
Petrolesakal
Updated on

नवी दिल्लीः लोकसभा निवडणुकांच्या निकालापूर्वी सामान्यांसाठी एक महत्त्वाची बातमी येत आहे. सरकारने देशांतर्गत तयार होणाऱ्या कच्च्या तेलावरील विंडफॉल कर ८ हजार ४०० रुपयांवरुन ५ हजार ७०० रुपये प्रतिटन इतका कमी केला आहे.

सुरुवातीला सरकारकडून विंडफॉल टॅक्समध्ये सातत्याने वाढ केली जात होती. मात्र आता सलग दुसऱ्यांदा सरकारने करकपात केली आहे. त्याचा परिणाम वाहनांमधील इंधनावर होणार आहे.

डिझेल, पेट्रोल, जेट इंधन यासह एटीएफच्या निर्यातीवर एसएईडी शून्यावर कायम ठेवण्यात आलेलं आहे. सीबीआयसी म्हणजेच सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेसने आपल्या एका आदेशात म्हटलं की, नवीन दर १६ मेपासून लागू करण्यात येतील.

Petrol
Arvind Kejriwal: प्रचार सभेतील केजरीवालांच्या विधानावर ईडीचा आक्षेप! सुप्रीम कोर्टानं काय म्हटलं? वाचा

दिल्लीमध्ये १६ मेपर्यंत पेट्रोलची किंमत ९४.७२ रुपये प्रतिलिटर आहे. तर डिझेल ८७.६२ रुपये प्रतिलिटर प्रमाणे मिळत आहे. त्यामुळे आता गुरुवारपासून नवीन दर लागू होतील, असं सांगितलं जातंय.

Petrol
Fact Check: प्रभू श्रीरामांची प्रतिकृती हातात घेतलेला ओवेसींचा 'तो' फोटो एडिटेड

१ मे रोजी कमी झाला टॅक्स

यापूर्वी सातत्याने करवाढ केल्यानंतर पहिल्यांदा १ मे रोजी सरकारने कच्च्या तेलावरील विंडफॉल टॅक्स कमी करण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा विंडफॉल टॅक्स ९ हजार ६०० वरुन ८ हजार ४०० रुपये प्रतिटन करण्यात आला होता. यापूर्वी १६ एप्रिल रोजी विंडफॉल टॅक्स ६ हजार ८०० रुपये प्रतिटनावरुन ९ हजार ६०० रुपये प्रति टन करण्यात आलेला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.