संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आज पासून सुरूवात होणार आहे. 25 दिवसांच्या या अधिवेशनाला आज 29 नोव्हेंबरपासून सुरूवात होणार असून, कृषी विधेयकासारख्या मुद्दयांमुळे हे अधिवेशन गाजणार असल्याची शक्यता आहे. पेगासेस स्पायवेअर आणि महागाई सारख्या मुद्यांवरून विरोधक केंद्र सरकारला घेरण्याच्या तयारीत असतानाच सत्ताधारी भाजप देखील अधिवेशनासाठी तयार असल्याचे दिसते आहे. दरम्यान, याकाळात 36 विधेयक पारित होतील अशी शक्यता आहे.
गेल्या काही काळापासून मोठ्या प्रमाणात चर्चेत असलेल्या तीन कृषी कायदे रद्द करण्यासाठीचे विधेयक आज केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर हे सादर करणार आहेत. सत्ताधारी भाजपसह काँग्रेसने देखील सर्व खासदारांना व्हिप जारी केला आहे. त्यामुळे अधिवेशनाचा पहिलाच दिवस वादळी ठरणार आहे.
दरम्यान, मागच्या काळात कृषी कायदे, लखीमपुर घटना, पेगासेस स्पायवेअर सारख्या मुद्यांवर अनेकदा गदारोळ झाला. त्यामुळे या अधिवेशनात देखील या मुद्यांवरून विरोधक सरकारला धारेवर धरतील. त्यामुळे हे अधिवेशन आरोप प्रत्यारोपांच्या गोंधळात जाणार की लोकांच्या हिताच्या मुद्यांवर सकारात्मक चर्चा होणार हे पाहावं लागणार.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.