Cyber Crime: फेसबुकवर अनोळखी व्यक्तीशी मैत्री नको रे बाबा! व्यापारी 95 लाखांना बुडाला; कशी झाली फसवणूक?

Cyber Crime scam : ऑनलाईन कुणाची भेट होणे. त्या अनोळखी व्यक्तीशी ओळख वाढणे. बोलणं सुरु झाल्यानंतर ऑनलाईन फसवणूक होणे अशा गोष्टी आता नेहमीच्या झाल्या आहे.
Cyber Crime
Cyber Crime
Updated on

गांधीनगर- ऑनलाईन कुणाची भेट होणे. त्या अनोळखी व्यक्तीशी ओळख वाढणे. बोलणं सुरु झाल्यानंतर ऑनलाईन फसवणूक होणे अशा गोष्टी आता नेहमीच्या झाल्या आहेत. तरी अजूनही अशाच प्रकारे काही लोकांची फसवणूक होत असेल तर जनजागृती कमी पडत असल्याचं म्हणावं लागेल. गुजरातच्या एका व्यापाऱ्याला फेसबुकवरुन भेटलेल्या एका महिलेने तब्बल ९५ लाखांना गंडवलं आहे.

ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. लोक अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवतात. थोड्या पैशाच्या आमिषाला बळी पडतात आणि फसवणूक करुन घेतात. गुजरातच्या अलकापुरीतील रहिवाशी असलेल्या देसाईंना एका फेसबुक फ्रेंडने फसवलंय. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भात वृत्त दिलं आहे. (woman befriended on Facebook the businessman from Gujarat lost a total of 95 lakh to a scam)

Cyber Crime
Nashik Cyber Crime: पेट्रोलपंपाच्या नावाखाली तब्बल 46 लाख 44 हजारांची फसवणूक! किराणा व्‍यापाऱ्याकडून सायबर पोलिस ठाण्यात तक्रार

फसवणूक कशी झाली?

मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात देसाई यांना एका अनोळखी महिलेची फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. महिला परदेशातील होती, तिचं नाव स्टिफ मिझ असं होतं. देसाई यांनी फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली आणि तिच्यासोबत बोलणं सुरु केलं. आधी ते फेसबुकवर बोलायचे पण नंतर ते व्हॉट्सअॅपवर बोलू लागले. ओळख चांगली झाल्यानंतर महिलेने व्यापाऱ्यासमोर एक चांगली ऑफर ठेवली.

महिला व्यापाऱ्याला म्हणाली की, 'ती परदेशात एक कंपनीसाठी काम करते. त्यांच्या कंपनीसाठी भारतातील काही हर्बल प्रोडक्ट लागणार आहेत. यासाठी व्यापाऱ्याने मध्यस्थ म्हणून काम करावे. त्याने १ लाखाचे हर्बल प्रोडक्ट खरेदी करावे, ते आमच्या कंपनीला दिल्यास त्याचे दोन लाख रुपये देण्यात येतील.' ऑफर चांगली होती. याचीच भुरळ व्यापाऱ्याला पडली.

Cyber Crime
Andhra Pradesh Politics: बिहार झालं आता BJP चं लक्ष आंध्र प्रदेश...! भाजपचा फॉर्म्युला B-J-P काय आहे?

महिलेने देसाईंची ओळख एका विरेंद्र नावाच्या डॉक्टरशी करुन दिली. त्याच्या माध्यमातून देसाईंनी १ लाखाचे सॅम्पल हर्बल प्रोडक्ट खरेदी केले. देसाईंनी नैतिकता म्हणून पॅकेट उघडून पाहिले नाहीत. सुरुवातील सर्व काही व्यवस्थित वाटत होतं. पण, विरेंद्रकडून पैशांची मागणी वाढू लागली. चांगला परतावा देण्याचं आमिष देसाईंना दिलं जात होतं. यातून देसाईंनी विविध बँक खात्यावर ९५ लाख रुपये ट्रान्सफर केले.

पैशांची मागणी वाढतच असल्याने शेवटी देसाईंना संशय आला. त्यांनी पॅकेट खोलून पाहिलं तर त्यात पावडर आणि बटाट्याचे चिप्स आढळले. आपली फसवणूक झाल्याचे समजताच देसाईंनी सायबर क्राईम पोलिसांकडे तक्रार केली. महिला आणि डॉक्टर तोपर्यंत गायब झाले होते. पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.