नवी दिल्ली- गोव्यामध्ये एका महिलेने आपल्या चार वर्षाच्या मुलाची हत्या केल्याचा प्रकार समोर आला होता. याप्रकरणी धक्कादायक माहिती समोर येत आहे. पतीला मुलाशी भेटता येऊ नये यासाठी तिने चिमुकल्याला संपवलं, अशी माहिती चौकशीतून समोर येत आहे. ( CEO of a Bengaluru start up allegedly murdered her four year old son in Goa Court order estranged husband Chilling details)
गोव्याच्या हॉटेलमध्ये नेऊन आपल्या चार वर्षाच्या मुलाची हत्या करण्याच्या प्रकरणात खुलासे समोर येत आहेत. माईंडफूल एआय लॅबची सीईओ असलेल्या सुचेना सेथने अत्यंत क्रूर कृत्य केलंय. माहितीनुसार, सुचेनाचे आपल्या पतीशी घटस्फोट घेण्याचे प्रयत्न सुरु होते. याप्रकरणी कोर्टात अर्ज दाखल करण्यात आला होता. कोर्टाने वडील वेंकट रमन यांना दर आठवड्याला रविवारी मुलाशी भेटण्याची परवानगी दिली होती.
कोर्टाने वेंकट रमन यांना व्हिडिओ कॉलच्या माध्यमातूनही मुलाशी संपर्क साधण्याला परवानगी दिली होती. कोर्टाच्या या आदेशामुळे सुचेना नाराज होती. त्यामुळे ती ६ जानेवारीला गोव्यामध्ये आली. पोलिसांचा दावा आहे की मुलाची हत्या करण्यासाठीच ती गोव्यामध्ये आली होती.
सुचेना चिमुकल्याचा मृतदेह बंगळुरुला घेऊन जात होती. ती बेंगळुरी पोहोचली असती तर तिने मृतदेह कुठेतरी लपवून ठेवला असता. पण, गोव्यातील हॉटेल स्टाफला संशय आला होता. सुचेना चेकआऊट करताना तिच्यासोबत मुलगा नव्हता. तसेच आरोपी ज्या खोलीत थांबली होती. तिथे हॉटेल कर्मचाऱ्यांना रक्ताचे डाग दिसले होते. त्यानंतर हॉटेलकडून पोलिसांना याची माहिती देण्यात आली.
आरोपी महिला गोव्यातून बंगळुरुला जाण्यासाठी टॅक्सी बूक करण्यास हॉटेल कर्मचाऱ्यांना सांगत होती. हॉटेल स्टाफने त्यांना सांगू पाहिलं की टॅक्सीपेक्षा विमानाने जाणे कमी खर्चात होईल. पण, सुचेना टॅक्सीसाठी अडून बसली होती. शेवटी टॅक्सी मागवण्यात आली. त्यावेळी तिच्यासोबत एक मोठी बॅग होती. याच बॅगमध्ये तिने चिमुकल्याचा मृतदेह ठेवला होता. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.