Video Viral: आजीने खिडकी उघडली अन् काळाने घातला घाला; वृध्द महिलेचा करुण अंत, पाहा नेमकं काय घडलं?

खिडकी उघडली अन् मृत्यूनं गाठलं; वृध्द महिलेचा जागीच करुण अंत पाहा नेमकं काय घडलं?
Video Viral
Video ViralEsakal
Updated on

ग्रेटर नोएडामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. फ्लॅटच्या बाल्कनीत उभी असलेली महिला विजेच्या हायटेंशनच्या संपर्कात आली. विजेचा धक्का लागताच महिलेच्या शरीराला आग लागली. यामध्ये महिलेचा मृत्यू झाला आहे. महिला पेटलेली असतानाच खाली उभ्या असणाऱ्या अनेकांनी या घटनेची व्हिडीओ बनवला आहे.

ग्रेटर नोएडामधील रबुपूरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मिर्झापूर परिसरामध्ये संबधित घटना घडली आहे. हायटेंशन तारेच्या संपर्कात आल्यामुळे महिलेच्या शरीराने एका क्षणात पेट घेतला. विजेचा शॉक लागताच महिलेच्या शरीरातून धूर निघू लागला आणि पाहता पाहता महिलेचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवला.

Video Viral
12 MLC Maharashtra Case : राज्यपाल नियुक्त आमदार प्रकरणी राज्य सरकारला 21 तारखेला मत स्पष्ट करण्याचे निर्देश

अंगुरी देवी (८० वर्षे) असं मृत महिलेचं नाव आहे. तिथूनच जात असलेल्या विजेच्या तारेच्या संपर्कात आल्यामुळे शॉक लागला. त्यात तिचा मृत्यू झाला, याबाबतची माहिती ग्रेटर नोएडाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक कुमार यांनी दिली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस महिलेच्या फ्लॅटमध्ये पोहोचले. त्यांनी पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.

Video Viral
Crime News: घरकाम करणाऱ्या महिलेने मालकाच्या घरातून चोरले 11 लाख रुपये, 5 वर्षात बनली लखपती पण...

'महिलेचा जागीच मृत्यू झाला. तिला रुग्णालयात नेणे शक्य नव्हते. विजेचा झटका लागल्यानंतर महिला निश्चल पडली आणि कुटुंबातील सदस्य तिला वाचवण्यासाठी पुढे आले. कुटुंबीयांनी कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही. कोणतीही तक्रार आल्यास आम्ही त्यावर आधारित कारवाई करू', असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले आहे.

पोलिसांनी पुढील कारवाई सुरू असल्याचे सांगितले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात एक विद्युत तार खूपच खाली लटकलेली आणि तिच्या बाल्कनीतून जात असल्याचे दिसून येत आहे.

Video Viral
12 MLC Maharashtra Case : राज्यपाल नियुक्त आमदार प्रकरणी राज्य सरकारला 21 तारखेला मत स्पष्ट करण्याचे निर्देश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()