कासारगोड - विषारी अन्नाचे सेवन केल्यामुळे एका २० वर्षीय तरुणीचा शनिवारी मृत्यू झाला. तरुणीने एका स्थानिक हॉटेलमधून मागवलेल्या बिर्यानीच्या सेवनाने तिचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पेरुंबला निवासी अंजू श्रीपार्वती हिने ३१ डिसेंबर रोजी कासरगोड येथे रोमांसिया नावाच्या हॉटेलमधून ऑनलाईन बिर्याणी मागवली होती. (Online Food news in Marathi)
'मुलीच्या पालकांनी याबाबत तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. शवविच्छेदन अहवालाच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितलं. या तरुणीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते, तेथून तिला तातडीने कर्नाटकातील मंगळुरू येथील दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे तिचा मृत्यू झाला.
दरम्यान, राज्याच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. जॉर्ज यांनी पठाणमथिट्टा येथे पत्रकारांना सांगितले की, या घटनेचा अहवाल सादर करण्याच्या सूचना अन्न सुरक्षा आयुक्तांना देण्यात आल्या आहेत. तसेच अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यांतर्गत (एफएसएसए) विषारी अन्न सेवन केल्याचा आरोप असलेल्या हॉटेलचे परवाने रद्द केले जातील, असं त्यांनी म्हटलं.
या आठवड्याच्या सुरुवातीलाच कोट्टायम मेडिकल कॉलेजमधील एका परिचारिकेचा कोझिकोडमधील एका भोजनालयातून अन्न खाल्ल्याने मृत्यू झाला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.