आसाममधील सिलचरमध्ये एका महिलेने आपल्या तान्ह्या मुलासोबत धक्कादायक कृत्य केले आहे. हा प्रकार बघून समाजात संताप व्यक्त होत आहे. आसाम मधील एका महिला आपल्या 20 महिन्यांच्या मुलाला सिगारेट ओढण्यास आणि दारू पिण्यास भाग पाडत होती. याबाबतची माहिती चाइल्ड हेल्पलाइन सेलला मिळताच त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली आणि आईला घरातून ताब्यात घेण्यात आले.
आसाम ट्रिब्यूनमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, चाइल्ड हेल्पलाइनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही घटना सिलचरच्या चेंगकुरी भागात घडली. पुराव्यामध्ये महिलेची काही छायाचित्रे आणि व्हिडिओ समाविष्ट आहेत. पोलीस आणि बालकल्याण समिती (CWC) आता आई आणि बाळाला ताब्यात घेऊन तपास करत असून या प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे.
या घटनेचे वृत्त सोशल मीडियावर पसरताच नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली. अनेक एक्स-युजर्सनी या महिलेचा तीव्र निषेध केला आणि तिच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. काहींनी असे सुचवले की मुलाला सांभाळता येत नसेल तर त्याला दत्तक द्या.
बाल संरक्षण अधिकारी धनजीत चौधरी यांनी सांगितले की, मूल आणि आई दोघेही सध्या बाल कल्याण समितीच्या (सीडब्ल्यूसी) ताब्यात आहेत. सखोल तपास सुरू असून निष्कर्षांच्या आधारे योग्य ती कारवाई केली जाईल. (Latest Viral News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.