VIDEO : दोन महिलांनी चालत्या ट्रेनमधून उडी मारली अन्..

Purulia Railway Station
Purulia Railway Stationesakal
Updated on
Summary

पुरुलिया स्टेशनवर दोन महिला चालत्या ट्रेनमधून खाली उतरण्याचा प्रयत्न करत आहेत; पण..

रेल्वे प्लॅटफॉर्मवर वारंवार अपघात होत आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सतर्कतेचं प्रमाण वाढल्यानं अपघातांना आळा बसू लागलाय. असाच एक प्रकार पश्चिम बंगालमधील (West Bengal) पुरुलिया रेल्वे स्थानकावर (Purulia Railway Station) घडलाय. दक्षिण-पूर्व रेल्वेच्या (South-Eastern Railway) ट्विटर हँडलवरून या घटनेचा व्हिडिओ ट्विट करण्यात आलाय.

संत्रागची-आनंद विहार ट्रेनमध्ये (Santragachi-Anand Vihar Train) दोन महिला प्रवासी बसल्याचं व्हिडिओमध्ये दिसतंय. पुरुलिया स्टेशनवर या महिला चालत्या ट्रेनमधून खाली उतरण्याचा प्रयत्न करत असताना याचदरम्यान त्यांचं नियंत्रण सुटतं आणि त्या दोघी प्लॅटफॉर्मवर अडकतात. त्यानंतर तिथं ड्युटीवर असलेले आरपीएफचे उपनिरीक्षक बबलू (Sub-Inspector Bablu) यांची नजर दोन्ही महिलांवर पडताच, ते धावत येऊन त्या महिलांचे प्राण वाचवतात. या जवानाच्या धाडसाचं कौतुक सर्वत्र होत आहे.

Purulia Railway Station
बर्फाखाली दडलेले 100 ज्वालामुखी फुटले तर जगात समुद्राचा 'प्रलय'

स्टेशनवर उभी असलेली ट्रेन प्लॅटफॉर्म सोडू लागल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यानंतर दोन महिला प्रवासी ट्रेनमधून खाली उतरू लागतात. त्यातील एक महिला ट्रेनपासून दूर प्लॅटफॉर्मवर पडलीय, तर दुसरी महिला रेल्वेच्या रुळालगतच पडलेली दिसतेय. तेवढ्यात एक पोलीस वेगानं धावत येतो आणि महिलेला वाचवतो. हा व्हिडिओ 30 नोव्हेंबर रोजी शेअर करण्यात आला होता. हा व्हिडिओ पोस्ट केल्यापासून आतापर्यंत 2200 लोकांनी पाहिलाय. ट्विटर युजर्सनी पोलीस जवानाच्या या वृत्तीचं कौतुक केलंय.

Purulia Railway Station
जगातील सर्वात मोठं Covid Center कोणतं?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()